Agriculture Electricity Bill : कोल्हापुरातील दिड लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ, ६९१ कोटींच्या थकबाकीतून सुटका

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख वीज ग्राहकांची सुमारे ६९१ कोटी रूपयांची थकबाकी माफी होणार आहे.
Agriculture Electricity Bill
Agriculture Electricity Billagrowon

Maharashtra Agriculture Scheme : राज्य सरकारकडून काल (ता.२८) अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी योजनांचा पाऊस पाडण्यात आल्याने शेतकऱ्यांना याचा भविष्यात मोठी मदत होणार आहे. दरम्यान सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या(HP) कृषी पंपांची सुमारे ४६ हजार ४०० कोटींची वीज बिलांची थकबाकी माफ करण्याचा निर्णय विधिमंडळ अधिवेशनात घेतला.

दरम्यान याचा कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख वीज ग्राहकांची सुमारे ६९१ कोटी रूपयांची थकबाकी माफी होणार आहे. ही थकबाकी सरासरी दहा वर्षातील असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात थकबाकीदारांचे प्रमाण राज्याच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे थकबाकीदारांपेक्षा प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या कृपीपंपधारक शेतकरी व वीज ग्राहकांना भुर्दंडच आहे, अशी प्रतिक्रीया इरिगेशन फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली.

सौर कृषी पंप

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील ८ लाख ५० शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली.

सिंचन क्षेत्र ३ लाख हेक्टरने वाढेल

विविध कारणांनी अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत १०८ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे ६१ प्रकल्प पूर्ण होतील. त्यातून ३ लाख, ६५ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल

Agriculture Electricity Bill
Budget 2024 : सरकारकडून बळीराजाला काय मिळालं? शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस

दूध अनुदान योजना नियमित

राज्यातील गायीच्या दुधात मोठी पडझड झाल्यानंतर राज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही योजना अतिशय संथगतीने सुरू राहिल्याने अनेक दूध उत्पादक यापासून वंचित राहिले होते. आतापर्यंत या योजनेंतर्गत २२३ कोटी ८३ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. दुधाच्या दरात सतत पडझड होत असल्याने ही योजना पुढे सुरू ठेवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा ही मागणी आम्ही केली होती. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ही मागणी​ मान्य के​लेली नाही. आजपर्यंतची वीजबिल थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? खतावर १८ टक्के जीएसटी आहे. म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूला लुटायचे आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा. या सरकारला खोट्या मलमप​ट्ट्या लावून दाखवायचे असेल, तर हे चिडलेले लोक अजिबात शांत बसणार नाहीत. विधानसभेच्या निवडणुका कधी होतात, याची वाट शेतकरी आणि महाराष्ट्राची जनता पाहत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com