ST Bus Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी पुणे विभागातून २७५ बसेस

ST Bus for Ashadhi Wari : आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागातून २७५ बसेस सोडण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Pune News : आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागातून २७५ बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच बाहेरील आगारांतून २०० बसेस मागविण्यात आल्या आहेत.

आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आळंदी येथून पायी चालत पंढरपूरला जातात. परंतु ज्यांना पायी चालत जाणे शक्य नाही, अशा भक्तांसाठी जाता एसटी सुविधा करण्यात आली आहे. यंदा पुणे विभागातून वारीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशा वेळी वारकऱ्यांना पंढरपूरला दर्शनासाठी जाताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पुणे विभागातील सर्व १४ आगारांतून जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

याचे सर्व नियोजन पूर्ण झाले असून, १० जुलैपासून या जादा गाड्या पंढरपूरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १५ ते १९ जुलै या काळात चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे. बसचे ग्रुप आरक्षण आणि तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांकरिता स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यातील सर्व आगारांत आरक्षणाची सुविधा सुरू आहे.

पुणे विभागातील २७५, तर बाहेरील २०० गाड्या

वारीच्या काळात गत वर्षी नियोजन केलेल्या जादा गाड्यांव्यतिरिक्त वारकऱ्यांच्या मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे यंदा एकूण ४७५ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही गाड्यांची मागणी वाढली, तर त्या पद्धतीने गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

ग्रुप असेल तर दारापर्यंत ‘लाल परी’

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांचा व वारकऱ्यांचा ४० जणांचा व त्यापेक्षा जास्त जणांचा ग्रुप असेल, तर एसटी महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. त्यांच्यासाठी एसटीकडून खास सोय करून ‘लाल परी’ दारातपर्यंत येऊन उभी राहील.

एसटी महामंडळाकडून वारीसाठी पुणे विभागातून २७५ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच बाहेरील विभागांतून जादा बसेस मागविण्यात आल्या आहेत. सध्या ऑनलाइन बुकिंग सुरू आहे.
- प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Water Supply Quotation: चारा व पाणीपुरवठा दरपत्रक सादरीकरणाला मुदतवाढ; ८ जूनपर्यंत संधी

Cotton Seed Black Market: देशी कापूस बियाणांचा जळगावात काळाबाजार; शेतकऱ्यांची लूट

Urea Fertilizer Supply: अकोला जिल्ह्यात पाच दिवसांत ७,१०१ टन युरिया उपलब्ध होणार; शेतकऱ्यांना दिलासा

Sina River Water Release: सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढ्यात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Maize MSP Procurement: हमीभावाने खरेदी फक्त सात टक्केच

SCROLL FOR NEXT