Simla News: मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील २५० रस्ते बंद करण्यात आले आहेत. स्थानिक हवामान कार्यालयाने राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १८) दिली. पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत राज्यात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने (एसईओसी) दिलेली माहिती अशी, की आपत्तिग्रस्त मंडीमध्ये एकूण १८१ रस्ते बंद आहेत, सिरमौरमध्ये २६ आणि कुल्लू जिल्ह्यात २३ रस्ते बंद आहेत, तर शुक्रवारी सकाळपर्यंत ६१ पाणीपुरवठा योजना आणि ८१ वीज वितरण ट्रान्स्फॉर्मर प्रभावित झाले आहेत.
हवामान खात्याने २१ आणि २३ जुलै या कालावधीत हिमाचल प्रदेशातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे आणि रविवारपर्यंत राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
गुरुवारी (ता. १७) सायंकाळी राज्याच्या काही भागांत हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. जोगिंदरनगरमध्ये ४० मिमी, साराहनमध्ये ३८ मिमी, जट्टन बॅरेजमध्ये २८.६ मिमी, कोठीमध्ये २८.४ मिमी, शिलारूमध्ये २६.४ मिमी, मुरारी देवीमध्ये २६ मिमी आणि नारकंडा आणि जोतमध्ये प्रत्येकी २३ मिमी पाऊस पडला.
एसईओसीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार २० जूनला मॉन्सून सुरू झाल्यापासून गुरुवारपर्यंत (ता. १७) सुमारे ११२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये ६७ आणि रस्ते अपघातांमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १९९ लोक जखमी झाले असून ३५ जण बेपत्ता आहेत.
या पावसाळ्यात ३१ वेळा पूर, २२ वेळा ढगफुटी आणि १९ वेळा झालेल्या भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशात १,२२० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.