Soybean Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issues: सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या अडीचशे तक्रारी

Farmers Complaints: दोन्ही जिल्ह्यांत यंदा सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या मोठ्या संख्येने तक्रारी झाल्या. यात धाराशिव जिल्ह्यातून १३४, तर लातूर जिल्ह्यातून १०८ शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही.

Team Agrowon

Latur News: दोन्ही जिल्ह्यांत यंदा सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या मोठ्या संख्येने तक्रारी झाल्या. यात धाराशिव जिल्ह्यातून १३४, तर लातूर जिल्ह्यातून १०८ शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. यातील काही शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिले तर काही शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, न उगवलेल्या बियाण्यांपैकी सर्वाधिक तक्रारी महाबीजच्या बियाण्यांबाबत असून अशा प्रकारात भरपाई देण्याबाबतची महाबीजची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे.

धाराशिवमध्ये २३ शेतकऱ्यांना बियाणे बदलून देऊन बोळवण केली आहे. पेरणी व खताच्या खर्चाच्या भरपाईसाठी मात्र ‘महाबीज’कडे कोणतीच उपाययोजना नाही. खासगी कंपन्यांकडून मात्र कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत तडजोड केली जात आहे.

धाराशिव जिल्ह्यात १३४ आल्या असून, १०५ तक्रारी महाबीजबाबतच्या असून २९ तक्रारी खासगी कंपन्यांबाबतच्या आहेत. यातील ९८ शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. लातूर जिल्ह्यात १०८ पैकी ५९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या, तर ४९ तक्रारींचे पंचनामे सुरू असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी सांगितले.

बियाणे न उगवल्यास महाबीजकडून केवळ बियाणे देण्यात येते. त्यासाठीही संबंधित बियाण्याच्या लॉटमधील पन्नास टक्के बियाण्यांबाबत तक्रारी येण्याचे बंधन आहे. तसे झाल्यास जिल्हा पातळीवरच संबंधित शेतकऱ्याला बियाण्यांच्या बदल्यात बियाणे दिले जाते. पेरणी, मशागत किंवा खताचा खर्च दिला जात नाही. त्यापेक्षा कमी तक्रारी आल्यास बियाणे बदलून देण्याबाबत महाबीजच्या मुख्यालयातून निर्णय घेण्यात येतो. त्याची प्रक्रियाही गुंतागुंतीची आहे.

लातूर जिल्ह्यात महाबीजच्या बियाणे न उगवल्याच्या तक्रारी असल्या तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत. ते वेगाने सुरू असल्याचे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. एम. माने यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यात ढोकीच्या बीजोत्पादन कार्यक्रमातील बियाण्यांशी संबंधित मोठ्या तक्रारी आहेत. आंध्र प्रदेशातील एका विद्यापीठाकडून मिळालेले पैदासकार बियाणे सदोष मिळाले. ४४ शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या.

त्यापैकी २३ शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिल्याचे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी सांगितले. अन्य तक्रारींबाबत एका लॉटमधील बियाण्यांची एकच तक्रार असून त्या लॉटमधील बियाण्यांबाबत दुसरी तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, खासगी कंपन्यांकडून बियाणे न उगवल्याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याला परस्पर भरपाई व बियाणे देऊन तडजोडीही करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

छावा संघटनेचे धरणे आंदोलन

लातूर जिल्ह्यात बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले. अशा कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने मंगळवारी (ता. ८) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संबंधित विक्रेते व कंपनीविरुद्ध कारवाईचे आश्‍वासन कृषी सहसंचालकांनी दिले. लातुरातही १४ शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले असून ६१ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केल्याचे सांगण्यात आले.

पुढील अधिवेशनापर्यंत कायदे

बोगस बियाणे व खताबाबत कायदे कधीपर्यंत आणणार तसेच कंपन्यांकडून दुबार पेरणीचा खर्च वसूल करणार का, असा प्रश्‍न आमदार कैलास पाटील यांनी मंगळवारी (ता. ८) विधानसभेत विचारला. त्यावर कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू करू व सूचनेनुसार योग्य कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. पाटील यांनी बोगस बियाण्यांबाबत सरकार बियाणे परत देऊ, असे म्हणत आहे. पण दुबार पेरणीसाठी खते व अनुषंगिक खर्च होतो, तो कंपनीकडून वसूल करणार का, असा प्रश्‍न केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT