Soybean Sowing : सोयाबीनची चार लाख हेक्टरवर पेरणी
Parbhani News : यावर्षी (२०२५) खरीप हंगामात शुक्रवार (ता.४) पर्यंत सोयाबीनची परभणी जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ५५६ हेक्टर (७७.३७ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख ३१ हजार २४३ हेक्टरवर (९०.१० टक्के) पेरणी झाली आहे.
या दोन जिल्ह्यांत सोयाबीनची एकूण ४ लाख २७ हजार ८९५ हेक्टरवर तर एकूण खरिपाची ७ लाख ७ हजार ५२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वाढीच्या अवस्थेतील पिकांना पावसाची गरज आहे. आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. मात्र कमी पावसाच्या भागातील पेरणी रखडलेली आहे.
कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सरासरी ५ लाख १८ हजार ४६७ पैकी ३ लाख ८४ हजार १८० हेक्टरवर (७४.१० टक्के) पेरणी झाली. त्यात सोयाबीनची २ लाख ५४ हजार ५४ पैकी १ लाख ९६ हजार ६५२ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची १ लाख ९१ हजार ९५४ पैकी १ लाख ५९ हजार ९७१ हेक्टर (८३.३४ टक्के) लागवड झाली आहे.
एकूण कडधान्याची ६६ हजार ६८१ पैकी २६ हजार ८९२ हेक्टरवर (४०.३३ टक्के) पेरणी झाली त्यात तुरीची ४२ हजार ६०२ पैकी २२ हजार १९७ हेक्टर(५२.१० टक्के), मुगाची १७ हजार ६०० पैकी ३ हजार ५३३ हेक्टर (२०.०७ टक्के), उडदाची ६ हजार ४१३पैकी १ हजार १२८ हेक्टरवर (१७.६० टक्के) पेरणी झाली.
तृणधान्यांची ५ हजार ४४९ पैकी ६६४ हेक्टर (१२.२० टक्के) पेरणी झाली त्यात ज्वारीची ३ हजार ८५७ पैकी ३७७ हेक्टर (९.७७ टक्के), बाजरीची ४९९ पैकी ४७ हेक्टर ९.४०टक्के), मक्याची ९८३ पैकी २४० हेक्टर (२४.४४ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सरासरी ४ लाख १० हजार ३९८ पैकी ३ लाख २३ हजार ३४९ हेक्टरवर (७८.७९ टक्के) पेरणी झाली.
त्यात सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख ३१ हजार २४३ हेक्टरवर (९०.१८ टक्के) पेरणी झाली. कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी ३४ हजार २६८ हेक्टरवर (८८.२७ टक्के) लागवड झाली. एकूण कडधान्यांची ५८ हजार ९९३ पैकी ५५ हजार ८१ हेक्टर (९३.३७ टक्के) पेरणी झाली.
त्यात तुरीचे सरासरी क्षेत्र ४५ हजार ३०६ हेक्टर असतांना ४७ हजार ७०२ हेक्टर (१०५.२९टक्के), मुगाची ७ हजार ७८१ पैकी ४ हजार २३६ हेक्टर (५४.४४ टक्के), उडदाची ५ हजार ८७९ पैकी २ हजार ९३१ हेक्टर (४९.८६ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची ६ हजार ७४५ पैकी २ हजार ६९८ हेक्टर (४०.०१ टक्के) पेरणी झाली त्यात ज्वारीची ५ हजार ५०५ पैकी २ हजार ४५३ हेक्टर (४४.५७ टक्के), मक्याची १ हजार २१८ पैकी २०९ हेक्टर (१७.२२ टक्के) पेरणी झाली.
सोयाबीन पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) शुक्रवार,ता.४ पर्यंत
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी ५१२७७ ३५३२५ ६८.८९
जिंतूर ४८४९२ ४००२२ ८२.५३
सेलू २०४४६ १९५३७ ९५.५५
मानवत १५१९९ १४४६२ ९५.१५
पाथरी १६४७९ ९३५५ ५६.७७
सोनपेठ १३९१२ ११३०६ ८१.२७
गंगाखेड २७०४६ १९४४२८ ७१.८३
पालम २३६८७ १३७८२ ५८.१८
पूर्णा ३७५१३ ३३३३९ ८८.८७
हिंगोली १९३६८ ३८८१७ २००.४२
कळमनुरी ५२३९५ ४४३०१ ८४.५५
वसमत ४९५२४ ४९९२७ १००.८१
औंढानागनाथ ४३४५८ ४३५०० १००.१०
सेनगाव ८३९०४ ५४६९८ ६५.१९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.