Rahibai Popere : बच्चू कडूंनी बीजमाता पोपेरेंकडून घेतली बियाणे संवर्धनाची माहिती

Indigenous Seed Conservation : नामशेष होत चाललेले ५२ पिकांचे ११४ वाण त्यांनी गावातील महिला शेतकऱ्यांच्या मदतीने जतन केलेले आहेत.
Desi Seed Conservation
Desi Seed Conservation Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांनी देशी बीज संवर्धक पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची भेट घेतली. कोंभाळणे (ता. अकोले) येथे झालेल्या भेटीत कडू यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच या भागातील समस्या सुटण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

राहीबाई यांनी ‘बायफ’ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीने देशातील पहिली गावरान बियाणे बँक उभारली आहे. नामशेष होत चाललेले ५२ पिकांचे ११४ वाण त्यांनी गावातील महिला शेतकऱ्यांच्या मदतीने जतन केलेले आहेत. या प्रसंगी या सर्व बियाण्यांचे तसेच औषधी वनस्पतींचे प्रदर्शन त्यांनी भरवले होते.

Desi Seed Conservation
Desi Seed Production : राहीबाई पोपेरेंकडून शेतकऱ्यांसाठी देशी बियाणे निर्मितीची मोहीम

देशी बियाणे संवर्धनाबाबत पोपरे यांच्या कामाविषयी तसेच अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी श्री. कडू यांनी राहीबाई यांची भेट घेतली. कोंभाळणे (ता. अकोले) येथे जाऊन भेट घेत गावरान बियाण्यांचा संग्रह व बीजबँक प्रकल्प यांची सविस्तर माहिती घेतली. राहीबाई यांच्याशी चर्चा करत बीज संवर्धनाचे कार्य करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या.

Desi Seed Conservation
Desi Seeds Conservation: देशी वाण संवर्धनासाठी ‘ज्ञानशक्ती’चा पुढाकार

कोंभाळणे हे डोंगरावर वसलेले गाव असल्याने पाण्याची गंभीर समस्या येथे निर्माण होते. शेती व दैनंदिन वापरासाठी पाण्याची गंभीर समस्या असल्याचे त्यांनी श्री. कडू यांच्या लक्षात आणून दिले.

शेतकऱ्यांसाठी गावरान बियाणे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी प्रहार संघटनेकडून व शासनाकडे पाठपुरावा करून पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी व ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे कडू यांनी सांगितले. कडू यांनी बीज बँकेतील संग्रहित केलेल्या बियाण्यांची सखोल माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com