
Parbbhani News : बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील खरीप २०२४-२५ मधील बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत बीज परीक्षण प्रयोगशाळेतील चाचणीत सोयाबीनच्या २ हजार २७६ लॉटचे ५३ हजारांवर क्विंटल नापास झाले आहे.
पास झालेल्या ३ हजार ९८३ लॉटचे १ लाख १५ हजारांवर क्विंटलवर बियाणे पेरणीसाठी मुक्त करण्यात आले. दरम्यान, कमी गुणवत्तेचे ४० हजारांवर क्विंटल बियाणे प्रक्रियेपूर्वीच बीजोत्पादक संस्थांनी माघारी घेतले.
खरीप २०२४-२५ मध्ये बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेच्या परभणी विभागीय बियाणे प्रमाणीकरण कार्यालयांतर्गत महाबीज व शेतकरी उत्पादक कंपन्यांतर्गत एकूण १२ हजार ६१५ बीजोत्पादकांनी २० हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावरील बीजोत्पादन कार्यक्रमाची नोंदणी केली होती.
त्यात १२ हजार २०७ बीजोत्पादकांच्या २० हजार २९८ हेक्टर सोयाबीनचा समावेश होता तर उर्वरित क्षेत्र तूर, मूग, उडदाचे होते. एकूण ११ हजार ९५२ बीजोत्पादकांच्या १९ हजार ७४६ हेक्टर क्षेत्र प्रमाणीकरण करण्यात आले. त्यात सोयाबीनचे १२ हजार २०७ बीजोत्पादकांचे २० हजार २९८ हेक्टर क्षेत्र होते.
सोयाबीनच्या ७ हजार ७२८ लॉटचे २ लाख ५८ हजार ९२२ क्विंटल बियाणे उत्पादन झाले होते. कमी गुणवत्तेचे १ हजार २२३ लॉटचे ४० हजार २१५ क्विंटल बियाणे प्रक्रिया करण्यापूर्वी बीजोत्पादक संस्थांनी माघारी घेतले. एकूण ६ हजार ५०५ लॉटचे २ लाख १७ हजार ६०१ क्विंटल बियाणे प्रक्रियेसाठी घेण्यात आले. प्रक्रियेनंतर ६ हजार ५२४ लॉटचे लाख ७५ हजार ६८ क्विंटल चांगले बियाणे (गुड सीड) मिळाले.
या बियाण्याची बीज परीक्षण प्रयोगशाळेत उगवण क्षमता तसेच वाण शुद्धता चाचणी घेण्यात आली. तसेच क्षेत्रीय चाचणीव्दारे संबंधित वाणांच्या आनुवंशिक गुणांची पडताळणी करण्यात आली. त्याद्वारे २ हजार २७६ लॉटचे ५३ हजार ७६२ क्विंटल बियाणे नापास झाल्याचे स्पष्ट झाले. इतर पिकांच्या नापास बियाण्यात तुरीचे २१ क्विंटल, मुगाचे ४.३ क्विंटल, उडदाचे ७९ क्विंटल बियाणे आहे. तुरीचे ८७७ क्विंटल, मुगाचे १३१ क्विंटल उडदाचे ३५२ क्विंटल पेरणीसाठी मुक्त करण्यात आले.
सोयाबीन नापास बियाणे स्थिती (क्विंटलमध्ये)
जिल्हा लॉट संख्या बियाणे
परभणी ३९४ १२०९४
हिंगोली २५१ ६८८८
नांदेड १६६ ५२३९
लातूर ९७५ १८६४७
धाराशिव ४९० १०९९२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.