Nirmala Sitaraman Agrowon
ॲग्रो विशेष

Union Budget 2024 : देशातील २५ कोटी लोकं दारिद्र्य रेषे बाहेर - अर्थमंत्री सितारामण

Nirmla Sitaraman : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज सादर केला.

Mahesh Gaikwad

Union Budget 2024 News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज सादर केला. लोकसभा निवडणुकांपूर्वी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून काय घोषणा केल्या जाणार याकडे देशातील जनेतेचे लक्ष लागून राहिले होते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्राचे अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागले होते.

अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला सिताराम यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणांच्या योजनांचा लेखाजोखा मांडला. तसेच सरकारच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' व्हिजनबद्दल सांगितले. गेले १० वर्ष हा देशासाठी परिवर्तनाचा काळ असल्याचे सांगत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे सांगितले.

२५ कोटी लोक द्रारिद्र्य रेषेवर

दरम्यान, केंद्र सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारला देशातील २५ कोटी जनतेला द्रारिद्र्यातून बाहेर काढण्यात यश आल्याचे सितारामण यांनी सांगितले. केंद्र सरकारने सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत केले असून देशातील गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या सक्षमीकरणावर भर देत असल्याचेही त्या म्हणाल्या.

४ कोटी शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा फायदा

आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सितारामण यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत देशातील ४ कोटी शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा दावा केला. या योजनेंतर्गत नुकसान भरापाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

याशिवाय देशातील ११.८ कोटी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यामातून सरकारी मदत देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे रोख रक्कम थेट कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT