Union Budget 2024 News : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज गुरूवारी (१ रोजी) सादर करणार आहेत. त्या २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता संसदेत सादर करतील. तर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर नवीन सरकार पुर्ण अर्थसंकल्प सादर करेल.
दरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्प २०२४ -२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूरी दिली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. अर्थमंत्री सीतारामन आज सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
दरम्यान या अंतरिम अर्थसंकल्पावरून बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या अभिभाषणात २०२३ हे वर्ष देशासाठी ऐतिहासिक आहे. तर यंदा देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग हा वेगवान राहील असा विश्वास दाखवला होता.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या नवीन संसद भवनात एक सन्माननीय निर्णय घेतला गेला. जो नारी शक्ती वंदन कायदा होता. तर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येथे आपल्याला संबोधित करत आहेत आणि उद्या निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. हे क्षण उत्सवाचे प्रतीक आहेत असे ते म्हणाले होते.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
अर्थमंत्री सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण, महिला आणि अल्प उत्पन्न असलेल्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मनरेगा वाटपातून पीएम किसान सन्मान निधीसाठी रक्कम वाढवण्याची घोषणा देखील होऊ शकते. नोकरदार वर्गासाठी आयकरातील मानक कपात वाढवण्याची आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा संरक्षण वाढवण्याची घोषणा होऊ शकते.
अर्थसंकल्पात तीन महिन्यांच्या खर्चाचा लेखाजोखा असेल
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदेत पोहोचले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात तीन महिन्यांचा संपूर्ण हिशेब आहे, जो सरकारला जनतेवर खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होतील आणि जुलै २०२४ पर्यंत केंद्र सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.
अर्थसंकल्पाच्या प्रती वितरित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात देण्यात आल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.