Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Update : नुकसानग्रस्त २४ हजार शेतकऱ्यांना विमा परतावे नाही

Agriculture Insurance : गत वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त २४ हजार ७९९ शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा मिळालेला नाही.

Team Agrowon

Amravati News : गत वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त २४ हजार ७९९ शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांना १ हजार रुपयांपेक्षाही कमी परतावा मंजूर करण्यात आला आहे. तर २९ हजार ३५६ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी दर्शवून त्यांचा परतावा होल्डवर ठेवण्यात आला आहे.

गत खरीप हंगामात जुलैतील अतिवृष्टी व ऑगस्टमधील पावसाचा खंड, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उंबरठा उत्पादनाच्या आधारावर परतावे देण्यात येणार होते. त्यासाठी पीककापणी प्रयोगाचा आधार घेण्यात आला. प्रारंभी कंपनीने परतावे देण्यास नकारघंटा वाजविली होती. मात्र कृषी विभागाने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तंबीनंतर नुकसानग्रस्तांना परतावे देण्यात आले.

जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ५६३ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीपोटी परताव्यासाठी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी १ लाख ८ हजार १५० शेतकऱ्यांना ४९.७७ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आल्याचे विमा कंपनीने म्हटले आहे, तर दाखल झालेल्या एकूण पूर्वसुचनेपैकी तब्बल ६१ हजार ४१३ सूचना कंपनीने परताव्याासाठी अपात्र ठरविल्या आहेत. त्यांचा ४३.३६ कोटी रुपये देण्यास कंपनीने नकार दिला आहे.

नुकसानीपोटी परतावे मिळतील, या आशेपोटी विमा काढलेल्या २४ हजार ७९९ शेतकऱ्यांना विम कंपनीने १ हजार रुपयांपेक्षा कमी परतावा मंजूर केला आहे. या शेतकऱ्यांचे ८५ लाख ६२ हजार रुपये कंपनीकडून येणे शिल्लक आहे. नवीन हंगाम सुरू झाला तरी अद्यापही या परताव्याबद्दल कंपनीने काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे ते मिळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

बॅंक खाते ‘व्हेरिफाय’ होण्यास अडचणी

विमा परताव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या २९ हजार ३५६ शेतकऱ्यांचे बॅंक खाते व्हेरिफाय होत नसल्याचे कारण देत विमा कंपनीने या शेतकऱ्यांना होल्डवर ठेवले आहे. त्यांचा ५ कोटी ५४ लाख रुपयांचा परतावा प्रलंबित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain in Maharashtra : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात पावसाचा 'येलो अलर्ट'  

Onion Management : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

Election Expenditure : खर्च तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या १२ उमेदवारांना नोटिसा

Digital Water Management : ‘डिजिटल वॉटर मॅनेजमेंट’ उपक्रमाची संकल्पना

Kolhapur Soybean Rate : हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्रीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT