PM Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विम्याचा बोजवारा, कागलमध्ये अद्याप पंचनामे नाहीत

Crop Insurance Kolhapur : कागल तालुक्यात विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी फिरकलेच नसल्याचे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
PM Crop Insurance
PM Crop Insuranceagrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture News : कागल तालुक्यातील दोन हजार १७० शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पीक विम्यासाठी पाच हजार ४५ अर्ज दाखल केले होते.‌ यामध्ये एक हजार ३१५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. महापुराच्या पाण्यात पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष दहा ते पंधरा दिवसांपूर्वी शेतावर जाऊन नुकसानीची ऑनलाईन तक्रार दाखल केली; परंतु विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी फिरकलेच नसल्याचे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

मुसळधार पावसामुळे कागल तालुक्यातील वेदगंगा व दूधगंगा नदीकाठावरील शेकडो एकरांवरील उसासह भात, सोयाबीन भुईमूग पिके कुजून गेली आहेत. यंदा तब्बल १८ दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली होती. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडून पंचनामे कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, दहा-पंधरा दिवसांनंतर पूरबाधित पिके पुन्हा थोडी फार हिरवी दिसू शकतील. मात्र पुरामुळे ते अशक्य झाल्याने उत्पादनात प्रचंड घट होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून पीक संरक्षित करावे, यासाठी गेल्यावर्षीपासून शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा उतरवला. गेल्या वर्षी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना अद्यापही भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

भरपाई मिळणार तरी कधी?

२०२३ च्या खरीप हंगामात रामचंद्र दत्तू गोते (आनूर), सुभाष भाऊ चौगुले (आनूर), लक्ष्मीबाई बाळाराम पाटील (म्हाकवे) यांनी गतवर्षी पीक विमा उतरवला होता; परंतु नुकसान होऊनही भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत कृषी सहायक ओंकार जाधव म्हणाले की, २०२३ च्या खरीप हंगामात कागल तालुक्यातील १५७० शेतकऱ्यांनी २८९९ विमा अर्ज दाखल केले करून ९१३ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. यापैकी केवळ ६० शेतकऱ्यांनाच पीक विमा परतावा मिळाला आहे. काही शेतकरी भरपाईसाठी पात्र असूनही त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही.

PM Crop Insurance
Sugarcane Crop Insurance : गेली नऊ वर्षे ऊस पीक विम्यापासून वंचित, हजारो हेक्टर पिकाचे नुकसान

चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी मी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरला होता. पुरामुळे माझ्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले. त्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करून पंधरा दिवस उलटले तरी अद्याप पंचनाम्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाहीत. पंचनाम्याअभावी पुढील हंगामातील शेती मशागतीसाठी वेळ होत असल्याची माहिती बंडोपंत पाटी या शेतकऱ्याने खंत व्यक्त केली.

यावर कागल तालुक्याचे विमा प्रतिनिधी मानसिंग चौगले म्हणाले की, पिकांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीकडून कागल तालुक्यासाठी एका सर्वेअरची नेमणूक केली आहे. मात्र, तो आजारी असल्याने पंचनामे झालेले नाहीत. एक-दोन दिवसांत तक्रारदार शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीमधील पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर दुसऱ्या यादीतील पंचनामे केले जातील असे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com