Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीक उत्पादनातील घट या जोखीम बाबीअंतर्गत २०२३ च्या खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगाआधारे परभणी जिल्ह्यातील २० महसूल मंडलांतील ८९ हजार ७३४ शेतकऱ्यांना ६३ कोटी ९१ लाख ६४ हजार १०६ रुपये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी शुक्रवारपर्यंत (ता. २) ५८ कोटी ३० लाख रुपये रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
२०२३ च्या खरिपात अवर्षणाच्या स्थितीमुळे परभणीतील परभणी, जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यांतील ६ मंडलांमध्ये सोयाबीनचे, गंगाखेड व पालममधील ३ मंडलांमध्ये कपाशीचे तर परभणी व जिंतूरमधील १५ मंडलांमध्ये तुरीचे उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्याचे पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले. त्यानंतर विमा कंपनीने या तीन पिकांसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर केला.
त्यात सोयाबीनच्या उत्पादनात घट आल्याबद्दल पिंगळी व टाकाळी कुंभकर्ण (ता. परभणी), दूधगाव (ता. जिंतूर), आवलगाव व शेळगाव (ता. सोनपेठ), माखणी (ता. गंगाखेड) या ६ मंडलांतील शेतकऱ्यांना ५० कोटी ९६ लाख ७८ हजार ९०० रुपये परतावा मंजूर केला. कपाशीच्या उत्पादनात घट आल्यामुळे महातपुरी व माखणी (ता. गंगाखेड), बनवस (ता. पालम) या ३ मंडलांतील ७ हजार ७२० शेतकऱ्यांना १० कोटी ६५ लाख ९८ हजारांचा विमा परताव मंजूर करण्यात आला.
मंडल पीक शेतकरी लाभार्थी पीकविमा देय रक्कम
पिंगळी सोयाबीन १०२४६ ८.५८
टाकळी कुंभकर्ण ६८६२ १०.१०
दूधगाव ९९२३ ११.४७
आवलगाव ८२१२ ३.३०
शेळगाव ५२२६ १३.९८
माखणी सोयाबीन १४३३७ ३.५३
महातपुरी कपाशी १७७३ ३.१६
माखणी कपाशी ३०५२ ०.८३२३
बनवस कपाशी २८९५ ६.६६
परभणी शहर तूर १०८ ०.३८५
परभणी ग्रामीण तूर ५१३ ०.१३६०
पेडगाव तूर ७२५ ०.१७७७
जांब तूर ९४६ ०.२४९०
दैठणा तूर ७५९ ०.१३७७
सिंगणापूर तूर २१६ ०.०६७६
पिंगळी तूर १९५ ०.५९८
टाकळी कुंभकर्ण तूर ५३८ १५२८
झरी तूर १२२३ ०.३२३१
जिंतूर तूर ३२२१ ०.१५९७
सावंगी म्हाळसा तूर २६०३ ०.९९०
बामणी तूर ५४८५ ०.२२५८
चारठाणा तूर २७८४ ०.१२२२
वाघी धानोरा तूर ४७९१ ०.१९८६
दूधगाव तूर ३१०१ ०.१४०५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.