Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ २३ कोटींचा कृती आराखडा

Water Shortage : परभणी जिल्ह्यातील ६२६ गावे व २३३ वाड्यांवर यंदाच्या (२०२४) जानेवारी ते जून या कालावधीत पाणीटंचाई उद्‍भवू शकते.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील ६२६ गावे व २३३ वाड्यांवर यंदाच्या (२०२४) जानेवारी ते जून या कालावधीत पाणीटंचाई उद्‍भवू शकते. संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांतर्गत १ हजार ७०३ कामे प्रस्तावित असून, त्यासाठी २३ कोटी ७ लाख ७० हजार रुपये निधी खर्चाच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यायात गतवर्षीच्या (२०२३) पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के कमी पाऊस झाला आहे.पाणीपुरवठा योजनांच्या स्रोत असलेल्या विंधन विहिरी, विहिरी तसेच लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा आहे. भूजल पातळी खालावली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईच्या संकटातून तूर्त दिलासा मिळाला आहे.

पाणीटंचाईची संकटे काहीसे लांबणीवर पडले. परंतु बेसुमार उपशामुळे जलस्रोतांची पाणीपातळी खालावली आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विशेषतः उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. येत्या जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे वाड्या मिळून एकूण ८५९ लोकवस्त्यांवरील संभाव्य पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित आहेत.

त्यात नवीन विंधन विहिरींची ५७५ कामांवर ४ कोटी ६० लाख रुपये, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या ९१ कामांसाठी ३ कोटी १५ लाख रुपये, तात्पुरत्या पूरक योजनांच्या ५६ कामांसाठी २ कोटी २ लाख रुपये, खासगी विहीर, बोअरच्या अधिग्रहण अंतर्गत ७८० योजनांसाठी ५ कोटी ९६ लाख ७० हजार रुपये, टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठ्याच्या २०१ योजनांसाठी ७ कोटी ३३ लाख ५० हजार रुपये असे एकूण १ हजार ७०३ प्रस्तावित योजनांसाठी २३ कोटी ७ लाख ७० हजार रुपये निधीचा कृती आराखड्यास जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा स्थिती (अपेक्षित खर्च कोटींत)

तालुका गावे वाड्या प्रस्तावित योजना अपेक्षित खर्च

परभणी ८१ ०० ९७ १.४४

जिंतूर १३६ ६१ ३८८ ५.४२

सेलू ८२ १३ १२७ १.३३

मानवत ८ ४ १२ ०.१०

पाथरी ३३ २२ ७२ ०.८०

सोनपेठ ४० ४६ १८६ २.५८

गंगाखेड ८५ ५७ ३७६ ५.२७

पालम ६६ ३० २१४ ३.३०

पूर्णा ९५ ०० २३१ २.८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT