Water Shortage in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित टंचाई कृती आराखडा रखडला

Water Issue : यंदा पावसाचे प्रमाण पाहता जिल्ह्यात पाणीटंचाई लवकरच भेडसावण्याची शक्यता असल्याने डिसेंबरपूर्वी प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : यंदा पावसाचे प्रमाण पाहता जिल्ह्यात पाणीटंचाई लवकरच भेडसावण्याची शक्यता असल्याने डिसेंबरपूर्वी प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत लांजा आणि संगमेश्वर या दोनच तालुक्यांचे आराखडे सादर झाले आहेत. उर्वरित तालुक्यांमधील टंचाईच्या बैठकाच झाल्या नसल्याने जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई कृती आराखडा रखडण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण २०२२ पेक्षा किंचित जास्त असले तरी सप्टेंबरअखेर मॉन्सून देशातून परतला होता. नोव्हेंबरमध्ये थंडी पडण्याऐवजी ऑक्टोबरचा उष्म्याचा कडाका डिसेंबरच्या मध्यानंतरही कायम आहे.

Water Shortage
Water Shortage : जिल्हा टंचाई कृती आराखडा १० कोटींनी वाढणार

सध्याचे वाढलेले तापमान पाहता जिल्ह्याला पाणीटंचाईला लवकर सामोरे जावे लागणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चिपळूण तालुक्यातील दोन गावांमध्ये तर पाणीटंचाई सुरू झाली आहे. मात्र या तालुक्यांचा अद्याप टंचाई कृती आराखडाच तयार झालेला नाही. त्याचबरोबर मंडणगड, दापोली, खेड, गुहागर आणि रत्नागिरी या तालुक्यांचेही पाणीटंचाई कृती आराखडे तयार झालेले नाहीत.

केवळ दोन तालुक्यांचेच आराखडे आल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यानेच तालुक्यांच्या बैठका झालेल्या नाहीत. त्यामुळेच टंचाई आराखडे झालेले नाहीत. गतवर्षी ११२ गावांमधील २१८ वाड्यांवर २० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

Water Shortage
Jaykwadi Water Issue : जायकवाडीत पाणी सोडण्यावर शासन ठाम

तालुका स्तरावर दुर्लक्ष

जलजीवनच्या माध्यमातून पाणी योजना राबवण्यात आल्या असल्या तरी पाण्याचे स्रोत आटल्यास पाणीटंचाई उद्‌भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठीच कृती आराखडे लवकरच तयार करून त्यावर वेळेत काम होणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे तालुकास्तरावर दुर्लक्ष केले जात आहे.

आराखडा वाढणार

जिल्ह्यात गतवर्षीचा पाणीटंचाई कृती आराखडा निम्म्यावर आणण्यात आला होता. गतवर्षी टंचाई आराखडा फेब्रुवारीअखेर मंजूर करण्यात आला होता. ५ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी देण्यात आली होती. यंदा लवकरच पाणीटंचाई सुरू झाल्याने टंचाई आराखड्याच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com