KVK Jalna
KVK JalnaAgrowon

Agriculture Science Center : शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत प्रगती अहवाल आणि कृती आराखडा सादर

KVK Report and Action Plan : कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षभरातील कामाचा प्रगती अहवाल तसेच येत्या वर्षातील कामाचा कृती आराखडा सादर करण्यात आला.
Published on

Jalna News : येथील खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समितीची शुक्रवारी (ता. २२) बैठक पार पडली. या बैठकीत कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षभरातील कामाचा प्रगती अहवाल तसेच येत्या वर्षातील कामाचा कृती आराखडा सादर करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेतीसाह्य मंडळाचे विश्वस्त व कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांची उपस्थिती होती. बैठकीला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एन. गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयसीएआर अटारी पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. तुषार आठरे हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे,

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. डी. एस. कांबळे, बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, बदनापूर कृषी विज्ञान केंद्रचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी, कृषिभूषण भगवानराव काळे,

KVK Jalna
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी प्रश्नी जानेवारीत एल्गार मेळावा

प्रगतिशील शेतकरी उद्धवराव खेडेकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, सहाय्यक आयुक्त सामाजिक वनीकरण विशाल कवडे, अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाचे दूध संकलन पर्यवेक्षक एस. के. मोरे, जिल्हा माहिती अधिकारी पी. एस. धोंगडे,

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जे.एम. शेख, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी अनिल राठोड, जिल्हा जलसंधारण व मृद संधारण कार्यालयाचे प्रतिनिधी एन. व्ही. घुले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी प्रवीण कथे, महिला शेतकरी प्रतिनिधी सुभद्रा जाधव, योगिता खांडेभराड यांचेसह तीस पेक्षा जास्त सदस्यांची उपस्थिती होती.

श्री. बोराडे म्हणाले, ‘‘बदलते हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्राने पुढील काळात पशुसंवर्धन, रेशीम उद्योगासह मत्स्य व्यवसाय या विषयावर जास्त भर द्यावा. रेशीम धाग्यापासून पैठणी तयार करण्यासाठी हातमाग उभा करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र पुढाकार घेईल.

डॉ. पवार म्हणाले, ‘‘कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या कामाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामाचा आणि तंत्रज्ञान विस्ताराचा विश्लेषणात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे.’’

यावेळी दोन घडी पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिवाय नावीन्यपूर्ण प्रयोग करून यशस्वी झालेल्या नामदेव माथने, नानासाहेब मुळे, मंगेश उजेड, कुशावर्ता जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अजय मिटकरी यांनी तर आभार प्रा. पंडित वासरे यांनी मानले.

KVK Jalna
Agriculture Department : कृषी विभागाच्या इमारतींसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश
खरपुडी व बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्र यांनी मिळून राज्य शासनाच्या विभागाच्या मदतीने विकासासाठी एकत्रितपणे काम करावे. शेतकऱ्यांनी कपाशीची फरदड घेऊ नये. त्यासाठी जनजागृती करावी.
डॉ. डी. एन. गोखले, संचालक, विस्तार शिक्षण ‘वनामकृवी’, परभणी.
प्रतिकूल हवामानात नुकसानीचे संभाव्य धोके टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विविधतेचा अवलंब करावा. फळबागा आणि रेशीम उद्योगाखालील क्षेत्र वाढवावे.
- गहिनीनाथ कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com