Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : पोलिस-शेतकरी संघर्षात पंजाबाच्या २४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; सीमेवर तणाव वाढला

Farmer Protest Punjab Haryana : शुभकरण सिंग भट्टीडा जिल्ह्यातील बकोली गावाचे रहिवाशी होते, अशी माहिती शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा यांनी दिली.

Dhananjay Sanap

Farmer News : पंजाब हरियाणा सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरूच आहे. या संघर्षादरम्यान खनौरी सीमेवर (ता.२१) सुभकरण सिंग या २४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पटियाला येथील रजेंदर मेडिकल हॉस्पिटलचे एच.एस. रेखी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार "तीन शेतकऱ्यांना खनौरी सीमेवरून हॉस्पिटला भरती करण्यात आलं. पण त्यातील एक शेतकरी मृत आहेत." असं रेखी म्हणाले. तर काही शेतकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे शंभू आणि खनौरी सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शुभकरण सिंग भट्टीडा जिल्ह्यातील बकोली गावाचे रहिवाशी होते, अशी माहिती शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा यांनी दिली. १३ फेब्रुवारीपासून 'दिल्ली चलो' आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिस आणि शेतकऱ्यांच्या संघर्षात हा पहिला मृत्यू असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

हरियाणा पोलिसांनी मात्र या अफवा असल्याची माहिती दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी एक्सवरून दिली आहे. बुधवारी सकाळपासून शंभू सीमेवर शेतकऱ्यांवर अश्रुधारा नळकांड्याचा मार करण्यात येत होता. त्यामुळे तणावाची स्थिती होती. तर दुपारी खनौरी सीमेवरही अश्रुधारा नळकांड्याचा मार पोलिसांनी सुरू केला. त्यामुळे अनेक शेतकरी जखमी झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT