Copernicus Report Agrowon
ॲग्रो विशेष

Copernicus Report : २०२४ सर्वाधिक उष्ण वर्ष; कोपर्निक्स क्लायमेंट चेंज सर्विसचा अहवाल

कोपर्निक्स क्लायमेंट चेंज सर्विसकडून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिध्द केला जातो. या अहवालात जानेवारी ते जून २०२४ दरम्यान तापमानात विक्रमी वाढ झाल्याचं अधोरेखित करण्यात आलं आहे.

Dhananjay Sanap

2024 Hottest Year : हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला बसू लागला आहे. त्यातच जागतिक तापमानातही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. २०२४ वर्ष हे १८५० नंतरचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचं युरोपियन महासंघाच्या 'कोपर्निक्स क्लायमेंट चेंज सर्विस' आणि ईसीएमडब्ल्यूच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये पूर्व औद्योगिक बेंचमार्क तापमानापेक्षा १.५ अंश सेल्सियसने तापमान अधिक होतं, असा या अहवालात सांगण्यात आलं आहे.

कोपर्निक्स क्लायमेंट चेंज सर्विसकडून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिध्द केला जातो. या अहवालात जानेवारी ते जून २०२४ दरम्यान तापमानात विक्रमी वाढ झाल्याचं अधोरेखित करण्यात आलं आहे. हवा आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होण्यासाठी मानवी हस्तक्षेप प्रमुख कारण ठरत असून एल निनोच्या प्रभावामुळे देखी तापमानात वाढ झाली. २०२४ मध्ये एल निनोचं संक्रमण होत ला निनाची स्थिती निर्मितीकडे झाली. त्याचाही परिणाम तापमान वाढीत झाल्याचं कोपर्निक्स क्लायमेंट चेंज सर्विसनं सांगितलं आहे.

जागतिक तापमानात होणारी वाढ पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा २ अंश सेल्सियसपेक्षा कमी ठेवण्यासाठी २०१६ मध्ये पॅरिस करार करण्यात आला. या कराराचं पालन करण्याचं ठरवण्यात आलं. परंतु दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होत आहे. समुद्राचे पृष्ठभागावरील तापमानदेखील उच्चांकीवर पोहचलं आहे. १९९१ ते २०२० मध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान सरासरीपेक्षा ०.५१ अंश सेल्सियस होतं, परंतु जानेवारी ते जून दरम्यान तापमानाने २०.८७ अंश सेल्सियसचा उच्चांक गाठला आहे.

तर कोपर्निक्स क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या संचालकाने या घडामोडीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधलं आहे. संचालक कार्लो बुओनटेम्पो म्हणाले,"अनेक जागतिक तपशीलावरून २०२४ वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. हवामानाचे भविष्य मानवांच्या हातात आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी तातडीने पावलं उचलावी लागतील." असंही बुओनटेम्पो म्हणाले.

दरम्यान, २०२३ मध्ये अंटार्क्टिका भागातील समुद्रात बर्फाची सीमा कमी होऊ लागली आहे. तसेच जून ते ऑक्टोबर दरम्यान समुद्रातील बर्फाची सीमा सर्वाधिक घटली आहे, असं कोपर्निक्स क्लायमेंट चेंज सर्विसच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chinese Raisin : चीनच्या बेदाण्याची शेतकऱ्यांना मोठी झळ

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

SCROLL FOR NEXT