Weather News : जागतिक पातळीवर २०२३ हे वर्ष सर्वांत उष्ण ठरले आहे. या वर्षातील १२ महिन्यांचे सरासरी तापमान १.५ अंशांच्या गंभीर पातळीपर्यंत वाढल्याचे दिसून आल्याचे जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यंदा देखील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत तापमान वाढीचा कल कायम राहिला आहे.
भारतासाठी २०१६ हे वर्ष १९०१ पासून विक्रमी सर्वांत उष्ण ठरले असून, त्यानंतर २०२३ हे दुसऱ्या स्थानावर आहे. जागतिक हवामान संस्थेने ‘स्टेट ऑफ क्लायमेट’ या वार्षिक अहवालानुसार २०२३ मध्ये जागतिक सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक कालावधीतील (१८५० ते १९००) सरासरी तापमानापेक्षा जवळपास १.४५ अंशांनी अधिक होते.
यावरून १७४ वर्षांतील नोंदीनुसार हे वर्ष सर्वांत उष्ण ठरल्याचे स्पष्ट होते. याशिवाय, हरितगृह वायू पातळी, महासागरातील उष्णता, समुद्र पातळी वाढणे, अंटार्क्टिका समुद्रातील बर्फ कमी होणे आणि हिमनदी मागे हटणे यासह सर्व हवामान निर्देशकांचे उच्चांक देखील मोडले गेले आहेत.
पॅरिस करारानुसार हवामान बदलाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी देशांनी जागतिक सरासरी तापमान वाढ पूर्व-औद्योगिक कालावधीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. जागतिक सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढले असून, बऱ्याच वर्षानंतर दीर्घकालीन तापमान वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मात्र ही पातळी गाठणे म्हणजे तापमान कायमस्वरूपी १.५ अंशाने वाढले असे म्हणणे सयुक्तिक नाही. भारतीय हवामान विभागाकडील नोंदीनुसार २०२३ मध्ये जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान १९८१ के २०१० या कालावधीतील वार्षिक सरासरीपेक्षा ०.६५ अंशाने अधिक होते. यापूर्वी २०१६ मध्ये यात सर्वाधिक ०.७१ अंशाची वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे २०१६ नंतर २०२३ हे दुसरे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे.
अंटार्क्टिकातील बर्फाचा विस्तार सर्वात कमी
दरम्यान, जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात गेल्या वर्षभरात घटलेल्या तीव्र हवामान घटना अधोरेखित करण्यात आल्या आहेत. त्यात २०२३ मध्ये अंटार्क्टिका समुद्रातील बर्फाचा विस्तार सर्वांत कमी असल्याची नोंद झाली आहे.
हिवाळ्याच्या अखेरीस यात गतवर्षांच्या तुलनेत १ दशलक्ष चौरस किमी घट झाली आहे. ही घट फ्रान्स आणि जर्मनीच्या एकत्रित आकारा एवढी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हवामान बदलावरील पॅरिस कराराच्या १.५ अंश सेल्सिअस मर्यादेच्या इतके जवळ आपण कधीच पोहोचलो नव्हतो. शतकाच्या अखेरीस तापमान १.५ अंश सेल्सिअस मर्यादेत वाढेल. यामुळे जगाला धोक्याचा इशारा (रेड अलर्ट) असून, समुद्रातील अभूतपूर्व उष्णता, हिमनद्यांची माघार आणि अंटार्क्टिका समुद्रातील बर्फाचे नुकसान हे विशेष चिंतेचे कारण आहे. जागतिक सरासरीवर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- सेलेस्टे साऊलो, सरचिणीस, जागतिक हवामान संस्था
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.