Team Agrowon
२०२३ वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात समुद्राचं तापमानही अधिक असल्याचं नोआनं सांगितलं आहे.
डिसेंबर महिन्यात मिचोंग नावाचं वादळ आलं होतं. त्यामुळं उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती.
पण उर्वरित भाग मात्र कोरडाठाक होता. देशाचा उत्तर, पूर्व आणि किनारपट्टीचा नैऋत्य भाग दुष्काळाच्या छायेत आहे.
यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. २०२३ वर्षात आशिया खंडात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
आणि अर्थातच त्याला एल निनो कारणीभूत असल्याचं हवामान अभ्यासकांचं मत आहे.
तर आशियात २०२३ या वर्षात कमाल तापमानात २.९ अंश सेल्सियसची नोंद झाली. त्यामुळं २०२३ वर्षे सरासरीपेक्षा सर्वाधिक तापमान असलेलं २७ वं वर्ष ठरलंय, असा नोआचा अहवाल सांगतो.