Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Bhandara Agriculture Department : भंडारा कृषी विभागात २०० पदे रिक्‍त, कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण

Agriculture Department News : भंडारा जिल्ह्यात मंजूर ४३५ पैकी तब्बल २०० पदे रिक्‍त असल्याने कार्यरत २३५ कर्मचाऱ्यांना शेतकरी हिताच्या योजना राबविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Team Agrowon

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात मंजूर ४३५ पैकी तब्बल २०० पदे रिक्‍त असल्याने कार्यरत २३५ कर्मचाऱ्यांना शेतकरी हिताच्या योजना राबविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान बांधावर पोहोचविण्यासोबतच योजनांच्या अंमलबजावणीचे कामही कृषी विभागावर आहे. परंतु पूर्व विदर्भातील दुर्गम अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात रिक्‍त पदांचा डोंगर असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना काम करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

भंडारा जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. पारंपरिक पद्धतीने या भागात धान शेती होते. या भागात पीक फेरपालटासाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मात्र ही जबाबदारी असलेला कृषी विभागच खिळखिळा असल्याने शेती योजनांचा प्रसार कसा होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

थेट योजनांवर काम, प्रकल्पांचे संचालन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशी कामे कृषी सहाय्यक करतात. परंतु रिक्‍त पदांमुळे दोन ते तीन सजांचा प्रभार सांभाळताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. गट- अ संवर्गातील अधिकाऱ्यांची पाचपैकी चार पदे रिक्‍त आहेत. त्यामध्ये कृषी उपसंचालकांच्या मंजूर चारही रिक्‍त पदांचा समावेश आहे.

ब प्रवर्गातील १७ पैकी ९, गट ब प्रवर्गातील कनिष्ठ अधिकाऱ्यांची २३ पैकी २, सहाय्यक प्रशासक अधिकारी, लेखा अधिकाऱ्याची प्रत्येकी एक जागा रिक्‍त आहे. एकूण ४२ पैकी १३ पदे रिक्‍त आहेत. गट ड प्रवर्गातील ७० पैकी १६ जागा भरलेल्या असून ५४ रिक्‍त आहेत.

यात रोपमळा मदतनिसांच्या ६, शिपाई ४० तसेच तालुका बीजगुणन केंद्रातील मजुरांच्या आठ जागांचा समावेश आहे. गट क प्रवर्गातील कृषी पर्यवेक्षकाच्या ४३ पैकी २ जागा रिक्‍त आहेत. सोबतच कृषी सहाय्यक ७१, लघुलेखक निम्नक्षेणी व अधिक्षकाची प्रत्येकी एक, कनिष्ठ लिपिक ७, आरेखक एक, अनुरेखक ३३ तर वाहनचाकांच्या ११ याप्रमाणे १२९ जागा रिक्‍त आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT