Agriculture Department : कृषिसेवकांची दोन हजार ७० पदे भरण्याचा प्रस्ताव

Agriculture Department Latest Update : कृषी विभागात गेल्या काही वर्षांपासून रिक्त जागांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी विभागात गेल्या काही वर्षांपासून रिक्त जागांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. तो कमी करण्यासाठी कृषी विभागाकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. कृषिसेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ पदे रिक्त आहेत.

त्यापैकी ८० टक्के म्हणजे २ हजार ७० पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. शासनाची मान्यता प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Department Of Agriculture
Agriculture Department : पीक उत्पादन वाढीसाठी ‘कृषी’चे पीकनिहाय नियोजन

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त गट- ‘क’मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरतीबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्‍चित करण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आहे.

कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदींनुसार वाहनचालक व गट- ‘ड’ संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदभरती करण्यात येईल.

Department Of Agriculture
Agriculture Department Action : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ विक्रेत्यांना दणका, सातारा कृषी विभागाकडून परवाने निलंबित

‘गट- क’ संवर्गातील सरळसेवा पदभरती ‘आयबीपीएस’ या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करारदेखील करण्यात आला आहे. त्यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पेसा क्षेत्रातील पदे भरणार :

राज्यपालांच्या २९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेनुसार, अनुसूचित, आदिवासी क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामध्ये कृषी सहायक संवर्गाचा समावेश आहे.

शासन निर्णयानुसार, विभागीय कृषी सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागांतील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्‍चिती व पदसंख्या निश्‍चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता मिळविण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

त्यामुळे कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही, मात्र मान्यता मिळताच भरती संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com