Food Safety First Agrowon
ॲग्रो विशेष

Food Safety First: भेसळयुक्त अन्न रोखण्यासाठी २० जण तैनात

Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी येतात. वारकऱ्यांना भेसळमुक्त, स्वच्छ व ताजे अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन दक्ष झाला आहे.

Team Agrowon

Solapur News: आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी येतात. वारकऱ्यांना भेसळमुक्त, स्वच्छ व ताजे अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन दक्ष झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दहा व शेजारच्या पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यातील १० असे एकूण २० अन्न निरिक्षक आषाढीसाठी तैनात झाले आहेत.

भेसळयुक्त अन्न ओळखण्यासाठी व रोखण्यासाठी हे पथक तैनात झाले आहे.पालखी मार्गावर असलेले अन्न, उपवासाचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ यांची कसून तपासणी केली जात आहे. शिळे, वास येणारे, भेसळयुक्त अन्न आढळल्यास जाग्यावर नष्ट केले जाते. संशयित असलेल्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले जातात.

आषाढी यात्रेदरम्यान घेतलेल्या नमुन्याचा प्रयोगशाळा तपासणी अहवाल तत्काळ मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आषाढी यात्रा कालावधीत मोबाईल लॅब कार्यरत आहे.अन्न व औषध प्रशासनाने इतरवेळी केलेल्या कारवाईतील नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठविले जातात. या प्रयोगशाळेतून तपासणीचा निष्कर्ष वेळेत येत नाही.

एक महिन्यात अहवाल यावा अशी अपेक्षा असताना साधारणतः दोन ते तीन महिन्यानंतर अहवाल येतात. या कालावधीत घटनेचे गांभीर्य कमी होऊन जाते. सोलापूर शहर अन्न प्रशासन विभागाने या प्रयोगशाळेला पाठविलेल्या ६८ नमुन्याचा अहवाल सध्या प्रलंबित आहे. कारवाईला वेळेत मूर्त स्वरूप येण्यासाठी प्रयोगशाळेचा अहवाल कमीत कमी कालावधीत येण्याची गरज आहे.

अन्न प्रशासन विभागाने यंदाच्या आषाढी यात्रेदरम्यान आतापर्यंत खवा, बासुंदी, तूप, भगर, साबुदाणा, तेल, शेंगदाणे यांचे नमुने घेतले आहेत. उपवासाच्या पदार्थांची, दूध व दुग्धजन्य पदार्थांचीही मोठ्या प्रमाणात तपासणी केली जाणार आहे. यात्रा कालावधीत वारकऱ्यांना स्वच्छ, ताजे, सकस अन्न मिळावे, यासाठी अन्न प्रशासन दक्ष आहे.
- सुनील जिंतूरकर, सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT