Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Horticulture Development : एकात्मिक फलोत्पादन विकासअंतर्गत २ कोटी ८० लाखांचा कृती आराखडा

Action plan : परभणी जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत २ कोटी ८० लाख रुपयांचा कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत २ कोटी ८० लाख रुपयांचा कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यात विदेशी फळपिके, मसाला पिके, पुष्पोत्पादन, सामूहिक शेततळे, नियंत्रित शेती आदी घटकांचा समावेश आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम कृती आराखड्यामध्ये फळपिके, विदेशी फळे (एक्झॉटिक फ्रूट क्रॉप) यासाठी ६ लाख ४० हजार रुपये तरतूद आहे. पुष्पोत्पादनासाठी ८ लाख ४० हजार रुपये, मसाला पिकांसाठी २ लाख ४० हजार रुपये, आळंबीसाठी (मशरुम) ८ लाख रुपये, जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी ४ लाख ७० हजार रुपयांची तरतूद आहे. सामूहिक शेततळ्यांसाठी ४७ लाख ८० हजार रुपये तर शेततळे अस्तरीकरणासाठी ९ लाख रुपयांची तरतूद आहे.

नियंत्रित शेतीसाठी ५० लाख ८० हजार रुपये, मधुमक्षिका पालनासाठी ४ लाख रुपये, फलोत्पादन यांत्रिकीकरणासाठी ५२ लाख ४० हजार रुपये, काढणीओत्तर व्यवस्थापनासाठी ७५ लाख १० हजार रुपये तर मनुष्यबळ विकासअंतर्गंत ७ लाख रुपये, क्षेत्र विस्तारासाठी ४ लाख रुपयांची तरतूद आहे.

गतवर्षी १ कोटी ४६ लाखांवर खर्च

परभणी जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत विविध घटकांवर १ कोटी ४६ लाख १६ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे. त्यात १२ सामूहिक शेततळ्यांवर १४ लाख ५२ हजार रुपये, नियंत्रित शेती या घटका अंतर्गत शेडनेट, पॉलिहाऊस यावर २३ लाख ५१ हजार रुपये,

यांत्रिकीकरणावर ४ लाख ४१ हजार रुपये, काढणीओत्तर व्यवस्थापनावर ९२ लाख ३७ हजार रुपये, क्षेत्र विस्तारअंतर्गत ९ लाख ४५ हजार रुपये, मनुष्यबळ विकासावर १ लाख ९० हजार रुपये खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT