PM Kisan Update 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या म्हणजेच पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमध्ये १९ व्या हप्त्याचं वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. चौहान बिहारमधील पटणा येथे कर्पूरी ठाकूर यांच्या १०१ व्या जयंती निमित शुक्रवारी (ता.२४) बोलत होते. यावेळी चौधरी यांनी माहिती दिली.
पीएम किसान योजनेचा १८ हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून ५ ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती. २० हजार कोटी रुपयांची निधी देशभरातील ९ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला. २०२५ मध्ये बिहारमधील विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आखणी केली जात आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
केंद्र सरकार पीएम किसान योजनेतून देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार म्हणजे महिन्याला ५०० रुपये देतं. त्याचं वितरण तीन टप्प्यात केलं जातं. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीमार्फत जमा केले जातात. या योजनेतून २०१९ मध्ये पहिल्या हप्त्याचा ३.४६ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. तर १८ व्या हप्त्याचा लाभ देशभरातील ९ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. तसेच पीएम किसानचं स्टेट्स तपासण्यासाठी योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन होमपेजवरील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा. त्यानंतर स्टेटस समजून घ्या वर क्लिक करा. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा टाका. गेट ओटीपीवर क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर तुम्हाला पीएम किसानच्या हप्त्याचा मागील तपशील पाहता येईल.
दरम्यान, यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदीसह पीएम किसानचा निधी वार्षिक १० हजार रुपये करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.