Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : सांगलीतील ७३ हजार शेतकऱ्यांना १९ कोटींचा परतावा

Crop Damage Compensation : अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी पीकविमा योजना सुरू केली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती, पावसाचा खंड यामुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ८८ हजार ९५६ शेतकरी पात्र झाले आहेत. त्यापैकी ७३ हजार ९६३ शेतकऱ्यांना परताव्याची १९ कोटी ९७ लाख ३९ हजार रुपयांची रक्कम बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. १४ हजार ९९३ शेतकऱ्यांना खात्यात २ कोटी ६७ लाख इतका परतावा जमा होण्याची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली आली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी पीकविमा योजना सुरू केली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांना विमा घेऊन संरक्षण दिले. राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित पिकांचा विमा उतरल्यानंतर सरकारकडूनही काही प्रमाणात विम्याचा हिस्सा भरला जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीकविमा घेण्यासाठी प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ८४४ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत १ लाख ९२ हजार ११ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले होते. यंदा कमी पाऊस, पावसाचा खंड यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने कृषी विभागाने त्याचे पंचनामे केले. त्यानुसार जिल्ह्यातील ८८ हजार ९५६ शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत.

या शेतकऱ्यांना २२ कोटी ६४ लाखांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ७३ हजार ९६३ शेतकऱ्यांना १९ कोटी ९७ लाखांची भरपाई दिली आहे. तर १४ हजार ९९३ शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे खरीप हंगामातील विम्याची रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT