Micro Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Subsidy : नांदेडला तुषार, ठिबकचे १९ कोटींचे अनुदान थकले

Agriculture Irrigation : शेतकऱ्यांनी जिरायती पिकांसह बागायती व फळबाग पिकांना जगविण्यासाठी शेतात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत (प्रति थेंब अधीक पीक) अनुदानावर ठिबक, तुषार हे सुक्ष्म सिंचन संच घेतले.

Team Agrowon

Nanded News : शेतकऱ्यांनी जिरायती पिकांसह बागायती व फळबाग पिकांना जगविण्यासाठी शेतात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत (प्रति थेंब अधीक पीक) अनुदानावर ठिबक, तुषार हे सुक्ष्म सिंचन संच घेतले. तुषार व ठिबक सिंचन संचासाठी निवड होवून आठ महिने झाले तरी नांदेड जिल्ह्यातील आठ हजार ८०८ शेतकऱ्यांचे १९ कोटी चार लाख रूपयांचे अनुदान थकले आहे.

त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या अनुदानासाठी शेतकरी कृषी कार्यालयाकडे चकरा मारत आहेत. शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत (प्रति थेंब अधीक पीक) अनुदानावर ठिबक, तुषार हे सुक्ष्म सिंचन संच उपलब्ध होणारी योजना कार्यान्वीत केली. त्याचा लाभही शेतकरी घेत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील ३१ हजार ५३७ शेतकर्‍यांनी २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास (प्रति थेंब अधीक पीक) योजनेतर्गत ठिबक, तुषार सिंचनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील आठ हजार ७७ शेतकर्‍यांची लॉटरी पद्धातीद्वारे निवड झाली होती. यातील सात हजार ६७७ शेतकऱ्यांनी तुषार, ठिबक सिंचन शेतात अनुदानावर बसवले.

यातील पाच १२२ शेतकऱ्यांसह २०२२-२३ मधील काही शेतकरी असे एकूण आठ हजार ८०८ शेतकऱ्यांना १९ कोटी चार लाख रूपये अनुदान मिळणे आवश्यक होते. परंतु मागील आठ महिन्यापासून शेतकऱ्यांना सुक्ष्मसिंचन संचाचे अनुदान मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने शेतकऱ्‍यांचे त्वरित अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

एकाच योजनेसाठी दोनवेळा लॉटरी पद्धत

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत (प्रति थेंब अधीक पीक) या योजनेत शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान दिले जाते. ५५ टक्के अनुदानापैकी ६० टक्के अनुदान केंद्र सरकार तर ४० टक्के अनुदान राज्य शासन देते. तर उर्वरीत २५ टक्के अनुदान राज्य शासन मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतर्गत शेतकऱ्यां‍ना देते. परंतु या एकाच योजनेसाठी दोनवेळा लॉटरी पद्धत काढली जाते. यामुळे शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान मिळाल्यानंतर २५ टक्के अनुदानासाठी चार ते सहा माहिन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT