Agriculture Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Fertilizer : बुलडाणा जिल्ह्यात खरिपासाठी १.७७ लाख टन खत मंजूर

Fertilizers Update : खरीप हंगामाच्या नियोजनाला सुरुवात करण्यात झाली असून कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याला खरीप हंगामासाठी एक लाख ७७ हजार ९०० टन रासायनिक खत वाटप मंजूर करण्यात आले आहे.

Team Agrowon

Buldhana News : खरीप हंगामाच्या नियोजनाला सुरुवात करण्यात झाली असून कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याला खरीप हंगामासाठी एक लाख ७७ हजार ९०० टन रासायनिक खत वाटप मंजूर करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात खताचा पुरवठा होणार आहे.

जिल्ह्यात मे अखेर १० हजार २९० टन खताचा साठा आवश्यक असून आतापर्यंत एक लाख पाच हजार ४५५ टन रासायनिक खतसाठा उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांना कृषी केंद्रामध्ये उपलब्ध खताची माहिती adozpbuldana.blogspot.com/2022/04/blog-post.html या ब्लॉगस्पॉटवर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी एकाच खताची मागणी करू नये. माती परीक्षणानुसार वेगवेगळ्या खताचा संतुलित वापर करावा, जेणेकरून जमिनीची सुपिकता टिकून राहून उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी अधिकृत परवानाधारकाकडून करावी, तसेच खरेदी केलेल्या रासायनिक खताचे पक्के देयक घ्यावे.

डीएपी या खताला पर्यायी खते म्हणून १०.२६.२६, १२.३२.१६, २४.२४.० एसएसपी, १५.१५.१५, २०.२०.०, २०.२०.०१३, १४.३५.१४ युरिया आणि डीएपी या रासायनिक खताचा वापर करून, जमीन आरोग्यानुसार शिफारस केलेल्या खताचा समतोल वापर करावा. तसेच नॅनो युरिया व नॅनो डीएपी इफ्को व आरसीएफ या उत्पादक कंपनीची खते उपलब्ध असून खताचा वापर फवारणीद्वारे करण्यात यावा.

शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे, किटकनाशकेबाबत तक्रारीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहेत.

जिल्ह्यात सद्यस्थितीत विक्रेत्यांकडे उपलब्ध साठा

खताचा प्रकार साठा

२०.२०.०.१३ ३५ हजार ९४३ टन

१०.२६.२६ १० हजार ५०५ टन

१५.१५.१५ ३ हजार ५७२

१६.१६.१६ १ हजार ९९३

२४.२४.० २ हजार ६४

१४.३५.१४ ३ हजार ८७३

युरीया १८हजार ६५३

डीएपी ५ हजार १०९

एमओपी १ हजार १८२

एसएसपी १९ हजार ४७५

इतर खते ३ हजार ८६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT