Agriculture Fertilizers : खरिपासाठी १ लाख २३ हजार ३०० टन खते मंजूर

Agriculture Department : खरीप हंगामासाठी परभणी जिल्ह्याला कृषी विभागाने १ लाख ५९ हजार ३०० टन खतांची मागणी केलेली असतांना कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या १ लाख २३ हजार ३०० टन रासायनिक खते मंजूर केली आहेत.
Fertilizer
FertilizerAgrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२४) खरीप हंगामासाठी (एप्रिल ते सप्टेंबर) परभणी जिल्ह्याला कृषी विभागाने १ लाख ५९ हजार ३०० टन खतांची मागणी केलेली असतांना कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या १ लाख २३ हजार ३०० टन रासायनिक खते मंजूर केली आहेत. नॅनो युरियाच्या ५५ हजार ८०० व नॅनो डीएपी ३५ हजार ८०० बॉटल्स मंजूर आहेत.

Fertilizer
Fertilizer Demand : खरीप हंगामासाठी १८ हजार ५६७ टन खतांची मागणी

यंदाच्या मागणीच्या तुलनेत ३६ हजार टन कमी तर गतवर्षीच्या १ लाख २० हजार ४६० टन खतांच्या तुलनेत २ हजार ८४० टन एवढा जास्त खतसाठा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी तथा प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली

परभणी जिल्ह्यात आगामी (२०२४) खरीप हंगामात ४ लाख ९५ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्याचा सरासरी खतांचा वापर ९६ हजार ५८१ टन आहे. त्यानुसार १ लाख ५९ हजार ३०० टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली होती. परंतु जिल्ह्याला विविध ग्रेडच्या १ लाख २३ हजार ३०० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.

Fertilizer
Fertilizer Management : खरिपासाठी ८५ हजार ४५१ टन रासायनिक खते मंजूर

त्यात युरिया २८ हजार २०० टन, डिएपी २४ हजार २०० टन, पोटॅश- एमओपी २ हजार ३०० टन, सुपर फॉस्फेट १८ हजार ८०० टन, संयुक्त खते -एनपीके ५३ हजार ८०० टन या खतांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यासाठी ७ हजार १७१ टन खत साठा मंजूर झाला आहे. त्यापैकी आजवर ७ हजार ७०६ टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.

त्यात युरिया ४ हजार ३६७ टन, डीएपी ३८५ टन, सिंगल सुपर फॉस्फेट २५० टन, एनपीके २ हजार ७०४ टन या खतांचा समावेश आहे. मार्च अखेर एकूण ६५ हजार ९८३ टन खते शिल्लक होती. त्यात युरिया १८ हजार ३३८ टन, डिएपी ५ हजार ९६७ टन, एमओपी-पोटॅश ७८१ टन, संयुक्त खते-एनपीके ३१ हजार ९१४ टन, सुपर फॉस्फेट ७ हजार ९८३ टन खते आहेत. मार्च अखेरची शिल्लक व एप्रिलमधील पुरवठा मिळून एकूण मिळून एकूण ७३ हजार ६८९ टन खतांचा साठा शिल्लक होता, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com