Lok Sabah Election 
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Postal Voting : पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चारही लोकसभा मतदार संघांतील ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी घरीच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चारही लोकसभा मतदार संघांतील ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी घरीच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेसाठी मतदारांना १२ ड हा अर्ज भरून देणे आवश्यक होते. त्यानुसार या चारही मतदार संघांतील ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या १ हजार ३९७ मतदारांनी, तर २६५ दिव्यांग मतदार असे एकूण १ हजार ६६२ मतदारांनी घरातून मतदान करण्यास पसंती दिली आहे.

सर्व स्तरातील मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत. मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच शारीरिक विकलांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक टपाली मतदानावर भर दिला जात आहे.

त्यासाठी अशा मतदारांची यादी निश्चित करून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या घरी भेट देऊन टपाली मतदान करणार अथवा मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणार याबाबतची माहिती घेतली. यामध्ये अनेक मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणार आहे. तर काही मतदार टपाली मतदान करणार आहेत. अशा मतदारांकडून १२ ड अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या मतदारांना टपाली मतदानाचा लाभ घेता येणार आहे.

मतदान करण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांना संबंधितांच्या घरी पाठवून त्यांचे मत नोंदविले जाणार आहे. त्यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले आहे. या कामकाजासाठी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यासाठी विधानसभानिहाय पथकांची नियुक्ती केली आहे.

या पथकामध्ये पथकप्रमुख तथा मतदान अधिकारी क्र.१ म्हणून सेक्टर ऑफिसर, मतदान अधिकारी क्र. २ म्हणून महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती असणार आहे. या कामकाजावर निरीक्षण ठेवण्यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी व्हिडिओग्राफर व पोलिस कर्मचारी यांचा पथकामध्ये समावेश असणार आहे. गोपनियतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने टपाली मतदानाचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT