Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Agrowon

Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ८ जागांसाठी मतदान ; ऊन पावसाचे मतदानावर सावट

Second Phase Voting For Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (ता.२६) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघांत मतदानाला सुरूवात झाली आहे.

Pune News : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (ता.२६) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघांत मतदानाला सुरूवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात १२०६ उमेदवार आपले नशिब आजमावण्यासाठी रिंगणात आहेत.

दुसऱ्या टप्प्यात कोणती राज्ये?

यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. याआधी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. पहिल्या टप्प्यात १९ राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशांमध्ये मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मिर, त्रिपूरा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे.

Lok Sabha Election 2024
Vidarbha Lok sabha 2024 : विदर्भात धाकधूक वाढली; दुपारपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

महाराष्ट्रात ८ जागांसाठी मतदान

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात आठ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये हिंगोली, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, नांदेड आणि वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे. आठही मतदारसंघात तुल्यबळ लढती पाहायला मिळत आहेत. परंतु पहिल्या टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरल्याने दुसऱ्या टप्प्यात तरी लोक मतदानासाठी बाहेर पडणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

मतदानावर ऊन पावसाचे सावट?

राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. तर काही भागांत अवकाळीच्या सरींसह गारपीटीच्या घटना घडल्या आहेत. सध्या अनेक भागात ढगाळ हवामान आणि उकाडाही वाढला आहे. तर काही ठिकाणी उन पावसाचा खेळ सुरू आहे. अशातच दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ-वाशिम या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election : राज्यात ‘मविआ’ पन्नास टक्के जागा जिंकेल

बदलत्या हवामानाचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असून याचा मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात मतदान कमी झाल्याने दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का किती होतो याकडेही राजकीय पक्षांचे लक्ष आहे.

महाराष्ट्रातील लढती अशा

  • अकोला - अनुप धोत्रे विरुद्ध अभय पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर (वंचित)

  • अमरावती -नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे

  • नांदेड - प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण

  • वर्धा - रामदास तडस विरुद्ध अमर काळे

  • परभणी - महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव

  • बुलडाणा - प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर

  • यवतमाळ - वाशिम - राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख

  • हिंगोली - बाबुराव कदम कोहळीकर विरुद्ध नागेश पाटील - आष्टीकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com