Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Election Update : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
Elections
Electionsagrowon

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रियेला सुरवात झाली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दोन हजार ११५ मतदान केंद्रे असून, त्यात १३ सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत.

त्यात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात दोन, शहादा विधानसभा मतदारसंघात नऊ व नंदुरबार मतदारसंघात दोन सहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १० क्रिटिकल मतदान केंद्रे आहेत. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.

Elections
Hatkanangle Lok sabha : भारतीय जवान किसान पार्टीकडून रघुनाथ पाटील हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात

नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात लोकसभा निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी खत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी खत्री यांनी सांगितले, की नंदुरबार जिल्ह्यात १ नंदुरबार (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ असून, यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती केली जात आहे, नागरिकांनी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा’ अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील चार व धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

Elections
Vidarbha Lok sabha 2024 : विदर्भात धाकधूक वाढली; दुपारपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

तेरा सहाय्यकारी मतदान केंद्रे

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात (६८-अ) वेली, (२६०-अ) वरखेडी बुद्रुक आणि शहादा विधानसभा मतदारसंघात (४४-अ) म्हसावद, (१२५-अ) चांदसैली, (१५५-अ) मलोनी, (१६८, १७३, १७८, १८९, २०८, २१२-अ) शहादा आणि नंदुरबार मतदारसंघात (१७१-अ) होळतर्फे हवेली, (२७२-अ) नंदुरबार शहर अशी १३ सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत.

दहा क्रिटिकल मतदान केंद्रे

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १० क्रिटिकल मतदान केंद्र असून, अक्कलकुवा मतदारसंघात दोन, नवापूर मतदारसंघात दोन, तसेच साक्री मतदारसंघात चार, तर शिरपूर मतदारसंघात दोन अशी एकूण १० क्रिटिकल मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात अक्कलकुवा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रे (मणीबेली, चिमलखेडी, बामणी, डनेल आणि मुखडी) अतिदुर्गम असल्याने या ठिकाणी मतदान पथके एक दिवस आधी म्हणजेच १२ मे २०२४ ला रवाना करण्यात येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com