Flood Affect Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Flood Affect Farmers : कोल्हापुरातील १६ हजार शेतकरी महापूर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

Farmers In Kolhapur : शेतकऱ्यांची गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम झाले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार होती.

sandeep Shirguppe

Flood Affect Farmers Kolhapur : मागील वर्षी २०२४ मध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर व अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पन्हाळा तालुक्यातील १६ हजार शेतकरी बाधित झाले होते. त्यांना १३ कोटी ३२ हजार रुपये मदत देणे आवश्यक असून ११ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु मंजूर झालेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पहायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात महापुराचे तब्बल ८ दिवस पाणी राहिल्याने खरिपासह ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानीबाबत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता. यामध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे पन्हाळा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता.

पन्हाळा तालुक्याचे नायब तहसीलदार संजय वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पन्हाळ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी अद्याप ८०० शेतकऱ्यांनी ‘केवायसी’ची पूर्तता केली नाही. ज्यांची केवायसी होण्यात अडचण आहे अशा शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. मंजूर झालेली रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर वर्ग करण्यासाठी प्रयत्नशील आहोत". असे वळवी यांनी सांगितले.

कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम झाले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार होती. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ नुकसानभरपाई जमा होणार होती. या प्रक्रियेस एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT