Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणासाठी १५४ प्रश्न

Maratha Reservation Survey : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केल्यानंतर सरकारी पातळीवर वेगाने हालचाली होत आहेत.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केल्यानंतर सरकारी पातळीवर वेगाने हालचाली होत आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाचे सर्वेक्षण करणार असून त्यासाठी तब्बल १५४ प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. आजपासून (ता. २३) हे सर्वेक्षण सुरू होणार आहे.

या प्रश्नावलीत सामाजिक, शैक्षणिक आाणि आणि आर्थिक विषयाशी संबंधित प्रश्न तयार करण्यात आले असून त्यात काही उपप्रश्नांचाही समावेश करण्यात आला आहे. कुटुंबांची सामाजिक, वैयक्तिक माहिती, आरोग्य, मालमत्तेचे स्वामित्व, उत्पन्नस्रोत आदींची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकार चालढकल करत असल्याने त्याविरोधात ते आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे येत आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत होत असून वाटेत त्यांच्या पदयात्रेत हजारो आंदोलक सहभागी होत आहेत.

हे आंदोलक मुंबईत येऊ नयेत यासाठी सरकारी पातळीवर मोठे प्रयत्न सुरू असून कुणबी नोंद सापडलेल्या मराठ्यांना तत्काळ प्रमाणपत्र देणे, तसेच मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. आजपासून (२३) पासून सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे.

सर्वेक्षणासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना गोखले इनस्टिट्यूट प्रशिक्षण देणार असून त्यादृष्टीने प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत माहिती संकलित केली जाणार असून १ लाख २५ हजारपेणा अधिक प्रगणक, पर्यवेक्षक, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

या प्रश्नावलीत नाव, गावापासून सुरुवात होते. त्यानंतर प्रवर्ग, मराठा आहात का0 घर मातीचे, बांबूचे, विटांचे, लाकडी, झोपडपट्टी की अन्य कुठल्या प्रकारचे आहे यांची माहिती, घराची मालकी, सध्या राहत असलेलेल्या वास्तव्याचा कालावधी, गावाला जोडणारा रस्ता कोणत्या प्रकाराचा, गाव शहराशी, दुसऱ्या गावाशी जोडले आहे का0

नदीवर पूल आहे का0 पूर्वजांचे मूळ निवासस्थान, जातीचा पारंपारिक व्यवसाय, सध्याचा व्यवसाय, सरकारी सेवेत कुणी आहे का0 कुणी व्यवासायिक आहे का0, कुटुंबातील कुणी लोकप्रतिनिधी आहे का0उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत0 घराचे क्षेत्रफळ, घरातील खोल्या, पेयजलाचा स्रोत, शौचाची सुविधा, बाथरूम आहे का0 स्वयंपाक घर आहे का0

जेवण कशावर करता0 मालकीची शेतजमीन आहे का0 शेतीचे पाणी कुठून आणता0 वीज आहे का0 शेतीपूरक व्यवसाय आहे का0 असेल तर तो दूध, कुक्कुट, मेंढी, वराह, मत्स्य पालन, रेशीम उद्योग की अन्य कोणता आहे का0 याची माहिती भरण्यात येणार आहे.

कुटुंबाचे उत्पन्न किती आहे, संबधित कुटुंबप्रमुखाची शेतजमीन धरण, महामार्ग, उद्योग, पुनर्वसन प्रकल्प आणि अन्य सरकारी प्रकल्पांमध्ये गेली आहे का0 त्याचा मोबदला मिळाला का0 शेतमजुरी करता का0स्त्रिया आणि पुरुषांना मिळणारी मजुरी, घरातील महिला घरकाम करायला जातात का0 असेही प्रश्न आहेत.

पिके आणि कर्जाची माहिती

सध्या तुम्ही कोणत्या मुख्य पिकाची लागवड करता तसेच गेल्या १५ वर्षांत कृषि कर्ज गेतले होते किंवा आहे का0 असाही प्रश्नावलीत प्रश्न आहे. घेतलेले कर्ज किती होते. त्या कर्जाची परतफेड केली का आणि सध्या कर्ज असेल तर ते आजारपण, लग्न कार्य, मुलांचे शिक्षण, सणवार,शेती, कार, गृह, सोने, टीव्ही,

इतर कारणासाठी घेतले याची माहिती घेतली जाणार आहे. हे कर्ज राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी, खासगी, बचतगट, क्रेडिट कार्ड, मायक्रो फायनान्स की सावकराकडून घेतले यांचीही माहिती घेतली जाणार आहे. तसेच कर्ज घेताना घर, शेतजमीन गहाण ठेवली का हेही विचारले जाईल. तसेच घरात पशुधन कोणत्या प्रकारचे आणि किती आहे याचीही माहिती संकलित केली जाणार आहे.

तुमचे कुटुंब स्थलांतरित झाले का0

प्रश्नावलीमध्ये कुटुंबाची माहिती घेताना तुमचे कुटुंब स्थलांतरित झाले असल्यास नोकरी, मजुरी, शैक्षणिक संधी, चांगल्य आरोग्य सेवेसाठी, सुरक्षित वातावरणासाठी, राहणीमानाचा दर्जा

उंचावण्यासाठी, सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांमुळे, अधिक चांगल्या करिअर संधी मिळविण्यासाठी, सरकारी धोरणांमुळे किंवा सरकारी धोरणांचा लाभ मिळविण्यासाठी, शुद्ध पर्यावरण मिळविण्यासाठी, लग्न किंवा सेवानिवृत्तीमुळे आदी पर्याय देण्यात आले आहेत.

सामाजिक परिस्थिती कशी आहे0

मराठा समाजातील प्रथा, परंपरांशी संबधित प्रश्नांचा समावेश प्रश्नावलीत असून लग्नात हुंडा दिला जातो का0 विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू, मंगळसूत्र घालण्यास लावण्यास अनुमती आहे का0 औक्षण करू शकतात का0 विधूर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का0विधवा स्त्रियांना धार्मिक कार्य, पूजा पाठ करू दिले जातात का0 हळदी कुंकू कार्यक्रमात बोलविले जाते का0शुभ कार्यात बोलविले जाते का0सार्वजनिक कार्यक्रमात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकतात का0 पडदा, बुरखा पद्धत आहे का0

मुलाचे, मुलीचे लग्न कुठल्या वयात केले जाते. मुलांचे लग्न उशिरा होते का0 त्याची कारणे काय0 कुटुंबात आंतरजातीय विवाह केला आहे का0 धार्मिक विधीत कोंबडा, बकऱ्याचाबळी देण्याची पद्धत आहे का0 आजारी पडल्यावर दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणे अशी पद्धत आहे का0 अशा प्रश्नांचा प्रश्नावलीत समावेश आहे. तसेच गेल्या १० वर्षांत कुटुंबात कुणी आत्महत्या केली आहे का0 केली असल्यास त्याची कारणे काय याचाही उपप्रश्न विचारला आहे.

इतर समाजाच्या तुलनेत तुमचे स्थान काय0

इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत का0 हा महत्त्वाचा प्रश्न असून कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने आर्थिक विकासाची समान संधी उपलब्ध आहे का0 तुमची जात, पोटजात दुय्यम वा कनिष्ठ समजली जाते का0 तसे असल्यास कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते, असाही प्रश्न विचारला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT