Maratha Reservation : मराठा आरक्षण फेब्रुवारीत

CM Eknath Shinde : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येत्या महिन्याभरात येईल, त्याचे अवलोकन करून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. १९) दिले.
Eknath shinde
Eknath shindeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आंदोलकांनी मदत करावी. सरकारच्या कामावर विश्वास ठेवा, तुम्हाला न्याय देऊ. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येत्या महिन्याभरात येईल, त्याचे अवलोकन करून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. १९) दिले.

मराठा आरक्षणप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधकांनी आणलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे, असेही सांगितले. मनोज जरांगे पाटील आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या राज्यभरातील सभा आणि त्यातील वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण बिघडू देऊ नये, असेही आवाहन केले.

Eknath shinde
Maratha Reservation : ओबीसींना धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्या

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील मराठा आरक्षण मागील सरकारच्या नाकर्तेपणामुळे टिकले नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशनसाठी विंडो उघडली आहे. त्यामुळे आशा लागली आहे. राज्यातील बहुतांश मराठा समाज हा मागासला आहे. तो मुख्य प्रवाहाच्या बाहेर असून, डोंगरदऱ्यांत अतिशय दुर्गम ठिकाणी राहतो. मराठा समाजाच्या जमिनींचे तुकडे झाले आहेत.

मराठा समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. सर्व मार्ग खुंटल्यावर व्यक्ती वेगळा मार्ग चोखाळतो त्यामुळे काही ठिकाणी आत्महत्या होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणप्रश्नी रिव्ह्यू पिटिशन फेटाळली होती. पण पण क्युरेटिव्ह पिटिशनमुळे आशा निर्माण झाली आहे. त्यासाठी पूर्ण यंत्रणा काम करत आहे.

Eknath shinde
Maratha Reservation : आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही : मनोज जरांगे पाटील

भुजबळांना सुनावले

मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यभर दौरे काढून जरांगे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याने तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांना अप्रत्यक्षपणे सुनावले. ‘मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणी घेता कामा नये.

ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी कोर्टापुढे कागदपत्रे मांडणे आवश्यक होते. मात्र सुनावण्यांमध्ये अतिशय निवडक व मर्यादित माहिती न्यायालयापुढे ठेवल्याचा आरोप शिंदे यांनी केला. मी याप्रश्नी राजकारण करणार नाही. पण मराठ्यांनी काढलेले ५६ मोर्चे अतिशय शांततेत होते. तरीही त्यांना ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवले गेले असा आरोप त्यांनी केला.

होय, मी शपथ घेतली

काही सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतल्याची आठवण चर्चेदरम्यान करून दिली होती. याचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, ‘मी शिवाजी महाराज यांची शपथ घेतली, कारण आमचे आराध्य दैवत आहे. जी वेळ मराठ्यांवर आलीय ती वेळ ओबीसींवर आली असती तरी मी छत्रपतींची शपथ घेतली असती. मी घाबरून काम करत नाही. ‘डू अँड डाय’ अशी माझे कामकाज करण्याची पद्धत आहे. जे बाळासाहेबांच्या मनात होते ते मी केले. १९६७ पूर्वी ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना आणि त्यांच्या रक्तनात्यातील सर्वांना दाखले मिळतील.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com