Ignite Maharashtra Parishad Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Export : यंदा १५०० कोटींच्या निर्यातीचा लक्ष्यांक

Team Agrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातून यंदा सुमारे दीड हजार कोटींच्या निर्यातीचा लक्ष्यांक ठेवण्यात आलेला असून यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन येथे झालेल्या इग्नाईट महाराष्ट्र परिषदेत करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित इग्नाईट महाराष्ट्र परिषदेत जिल्ह्यातील ३७५ उद्योजकांनी सहभाग नोंदविला.

या वेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, उद्योग उपसंचालक रंजना बोराळे, विदेश व्यापार महासंचालनालयाच्या संचालक स्नेहल ढोके, ‘आयडीबीआय’चे वरिष्ठ कार्यकारी लोहीत ऋषी, सीडबीचे महाव्यवस्थापक मनोज सहयोगी, न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे आनंद अमृतकर, वस्तू व सेवा कर उपायुक्त आत्माराम अवचार, कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी भास्कर मोरडे, डाक विभागाचे गजेंद्र जाधव, चैतन्य बायोटेकचे संचालक प्रसन्न देशपांडे, कामगार उपायुक्त विजय शिंदे विभाग उपस्थित होते.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे परिषदेच्या आयोजनाबाबत तर जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनील पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली. सन २०२४-२५ करिता १५०० कोटींचे निर्यातीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे. यासाठी उद्योजकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्रसन्न देशपांडे यांनी निर्यात करताना आंतरराष्ट्रीय घडामोडीचा निर्यातीवर परिणाम होत असल्याचे सांगितले.

रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनच्या समुद्री मार्गाभोवती रशियाच्या सैनिकांनी घेराव घातल्याने भारतातून निर्यात होणारे कंटेनर सहा महिन्यांपर्यंत अडकले असल्याचे सांगितले. अशा प्रकारे विविध कारणांनी निर्यातीस अडसर निर्माण होत असल्याचे सांगितले. भास्कर मोरडे यांनी औद्योगिक धोरणामध्ये एकात्मिक साह्यता कक्ष स्थापन करण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये मैत्री पोर्टल अद्ययावत करण्यात आले. सद्यःस्थितीत या पोर्टलवर १८ विभागांच्या एकूण ११९ ऑनलाइन सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले.

स्नेहल ढोके यांनी निर्यातीसाठी सर्वप्रथम आयात निर्यात कोड देण्यात येतो. विदेश व्यापार संचालनालयाकडे नोंदणी केल्यानंतर कस्टम ड्यूटी माफ होते. तसेच कृषी उत्पादनाकरिता ‘ॲपेडा’कडे नोंदणी करावी लागत असल्याचे सांगितले. लोहीत रुषी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या उद्योजकांना ५ कोटींपर्यंत विनातारण कर्ज देण्यात येत असल्याचे सांगितले.

आनंद अमृतकर यांनी उद्योजकांनी घटकाचा विमा काढणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्योग सुरू होण्यास विलंब झाल्यास होणाऱ्या नुकसानीचा भरणा केला जात असल्याचे सांगितले. गजेंद्र जाधव यांनी, पोस्ट विभागामार्फत उद्योजकांना ३५ किलोपर्यंत वजनाचे उत्पादने देश किंवा देशाबाहेर निर्यात करायचे असल्यास बुकिंग केल्यानंतर डाक कर्मचारी पॅकिंगपासून पार्सल सुरक्षित वाहतूक करण्याची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT