School Education Department agrowon
ॲग्रो विशेष

School Education Department : राज्यात होणार १५ हजार शिक्षकांची भरती; शालेय शिक्षण विभागाकडून सरकारला प्रस्ताव

Education Department : शालेय शिक्षण विभागाने १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Government : शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती ३० जूनपूर्वी केली जाणार आहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या. त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे त्या जिल्हा परिषदांमधील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे.

सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे. नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वशिलेबाजीला लगाम

खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे. पण, या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थिती राहील, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशिलेबाजीला लगाम बसणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: मतदारांचा कौल कुणाला?; मतमोजणीला सुरुवात

Modi Epstein Controversy: नरेंद्र मोदी आणि एपस्टीन यांचे नाते काय?: चव्हाण

MFOI Award 2025: अमृतालयम ‘एफपीओ’ ला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार

Birth Records: दीड हजार लोकवस्तीच्या गावात २७ हजार जन्म नोंदी

Farmer Issue: ‘जाचक अटी दूर करून कापूस, सोयाबीन खरेदी करा’

SCROLL FOR NEXT