Cooperative Societies Election : सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश; गावपातळीवरील राजकारण तापणार

Cooperative Societies : सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ६ जानेवारी २०२५ पासून सुरू करण्याचे आदेश निवडणूक प्रधिकारणाने दिले आहेत.
Cooperative Societies Elections
Cooperative Societies Electionsagrowon
Published on
Updated on

Cooperative Societies Election Maharashtra : गेल्या वर्षात तीनवेळा स्थगिती मिळालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सोमवार (ता. ०६) पासून सुरू होणार आहे. याबाबतचा आदेश निवडणूक प्रधिकरणाकडून (ता.०४) देण्यात आला. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे, अशा संस्थांना यातून वगळले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी हे आदेश प्रसिद्ध केले आहेत.

३१ डिसेंबरला स्थगितीची मुदत संपूनही अद्याप नवे आदेश आले नाहीत, त्यामुळे निवडणुका होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था वाढत होती. त्यांनतर तातडीने हे आदेश निघाले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, 'क' वर्गातील ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशनाच्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेला आहे, अशा संस्थांनी सुधारीत निवडणूक कार्यक्रम तालुका-प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता घ्यावी. तसेच ज्या संस्थांच्या मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम ज्या टप्प्यावर पुढे ढकलला आहे, त्याच टप्प्यापासून पुढे सुधारित मतदार यादी कार्यक्रम राबवावा लागणार आहे.

Cooperative Societies Elections
Farmers in Kolhapur : कोल्हापुरातील ४ तालुक्यांत गवे, वाघ, बिबट्या, टस्करांची भिती; पिकांचे मोठे नुकसान

तसेच अ, ब, क आणि ड सहकारी संस्थांनी प्रारूप मतदार यादी तयार करून १ जानेवारी २०२५ ची सुधारित तारीख घ्यावी. सर्व सहकारी संस्थाच्या संचालक मंडळातील नैमित्तिकपणे रिक्त झालेली पदे भरण्यासाठी १९ एप्रिल २०२२ पासून उचित कार्यवाही करावी.

गावपातळीवर अधिक महत्व

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकरणासाठी महत्त्वाच्या असलेल्या सहकारी संस्थांतील निवडणुकांचा धुरळा आता उडण्यास सुरुवात होणार आहे. साधारण चारशे संस्थांच्या निवडणुकींचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. त्यामुळे आगामी दोन- चार महिन्यांत गावपातळीवर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर या निवडणुका होत असल्यामुळे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com