Irrigation Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Subsidy : वाळवा तालुक्यात दीड कोटींवर ठिबक अनुदान जमा

Drip Irrigation : केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या तुषार व ठिबक योजनेचे २०२३-२४ मधील ५२७ लाभार्थींचे १ कोटी ६२ लाख ५१ हजार रुपये अनुदान जमा झाले.

Team Agrowon

Ratnagiri News : केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या तुषार व ठिबक योजनेचे २०२३-२४ मधील ५२७ लाभार्थींचे १ कोटी ६२ लाख ५१ हजार रुपये अनुदान जमा झाले. आणखी ८५७ लाभार्थींचे २ कोटी ५४ लाख ७८ हजार ५२ रुपये अनुदान प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.

शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरविण्यात येतात. ‘महा-डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड केली जाते.

निवड झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया होते. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. हे अनुदान केंद्र व राज्य शासन वितरित करते. मात्र काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ‘ब्रेक’ लागला होता.

तालुक्यातील १ हजार ४२४ शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून गत वर्षी ठिबक संच विक्रेत्याचे पैसे भागविले आहेत. मात्र ते अनुदान स्वरुपातील पैसे आज मिळतील, उद्या मिळतील, या आशेने लाभार्थी शेतकरी वाट पाहत आहे. तुषार व ठिबक योजनेचे २०२३-२४ मधील ५२७ लाभार्थींचे १ कोटी ६२ लाख ५१ हजार रुपये अनुदान जमा झाले आहेत.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत ८५७ लाभार्थींचे अनुदान प्रलंबित आहे. यासाठी पाठपुरावा सुरू असून लाभार्थींच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहेत.- इंद्रजित चव्हाण, कृषी अधिकारी, वाळवा तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन; मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

Agriculture Policy Controversy: केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांवर अनुदान मंजुरीवरून आरोप; भाजपने आरोप फेटाळले

Crop Insurance Data Discrepancy: पीकविमा नफ्याच्या आकडेवारीत विसंगती

Russia Fuel Shortage: युक्रेन युद्धामुळे रशियात इंधनटंचाई

Illegal Money Lending Act: अवैध सावकारीला आळा घालू; सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची कायद्यात बदल करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT