Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Bharari Pathak : बियाणे, खते तपासणीसाठी १५ भरारी पथके

Team Agrowon

Nagar News : खरीप हंगाम २०२४ साठी यंदा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. १५ भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाने केली आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठा उपलब्धतेत अडचणी उद्भवल्यास शेतकऱ्यांनी तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष किंवा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील (०२४१) २३५३६९३ किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील (०२४१) २४३०७९२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.

नगर जिल्ह्यात कृषी निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. याबाबतची जबाबदारी मोहीम अधिकारी अमृत गांगडे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व समिती स्थापना करण्यात आलेली आहे.

तालुका कृषी अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हा स्तरावर एक, प्रत्येक तालुका स्तरावर एक अशी १५ भरारी पधके नियुक्ती केली आहेत.

बियाणे घेताना काळजी घ्यावी...

अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे.

बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेण्यात यावी.

खरेदी पावतीवरील लॉट नंबर व बियाण्याच्या बंगवरील टॅग व लॉट नंबर पडताळून पहावे.

बियाणे बंग फोडताना वरील बाजूचा टॅग बॅगेला तसाच ठेवावा.

खालच्या बाजूने बॅग फोडावी

बियाणे उगवणीसंदर्भात काही तक्रार उदभवल्यास तक्रार दाखल करावी.

बियाण्याची फोडलेली पिशवी टॅगसहीत पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावी

कीटकनाशके किंवा तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासावी.

अधिकृत विक्री केंद्रामधूनच खते खरेदी करावीत.

फिरत्या वाहनामधून खतांची विक्री होत असल्यास तक्रार करावी.

खतांचा ई-पॉस साठा, प्रत्यक्षातील साठा तपासला जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT