Ground Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water Storage : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये १.४१ मीटरने वाढ

Water Stock : मॉन्सून कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा (२०२४) ऑक्टोंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ४.२० मीटर असल्याचे आढळून आले.

Team Agrowon

Parbhani News : मॉन्सून कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा (२०२४) ऑक्टोंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ४.२० मीटर असल्याचे आढळून आले. भूजल पातळीत मागील ५ वर्षातील सरासरीच्या तुलनेत १.४१ मीटरने वाढ झाली. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनेकडून घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात यंदा जून ते सप्टेंबर या (मॉन्सून कालावधी) चार महिन्यात सरासरी ७६१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. परंतु यंदा ८२७.३ मिलिमीटर (१०८.७ टक्के) पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात २६७.९ मिलिमीटर (१५८.५ टक्के) पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भात पाणी मुरण्याच्या प्रमाणात वाढ झाली.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ८६ निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. त्यानुसार यंदाच्या ऑक्टोंबर महिन्यात जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ४.२० मीटर असल्याचे आढळून आले आहे. २०१९ ते २०२३ या ५ वर्षातील भूजल पातळी सरासरी ५.३३ मीटर आहे.

यंदा ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या तुलनेत सर्व ९ तालुक्यातील भूजल पातळीमध्ये ०.३७ ते १.६४ मीटरने वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. ऑक्टोबरमध्ये पूर्णा तालुक्यातील भूजल पातळी सर्वात वर म्हणजे १.७१ मीटर तर गंगाखेड तालुक्यातील भूजल पातळी सर्वात खोल म्हणजे ५.८६ मीटर असल्याचे आढळून आले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमधील भूजल पातळीची तुलना केली असता जिंतूर तालुक्यात ०.२५ मीटरने वाढ झाली आहे. परंतु इतर ८ तालुक्यातील भूजल पातळीत किंचित घट झाली आहे. भूजल पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे विहीरी, बोअर आदी सिंचन स्त्रोतांना पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

रब्बी हंगामात पाण्याचा नासाडी टाळून सिंचनासाठी उपयोग केला तर उन्हाळी हंगामात देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहू शकते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवण्याची शक्यता कमी आहे.

पारंपारिक प्रवाही पद्धतीने पाणी देण्याऐवजी ठिबक,तुषार संच आदी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होईल शिवाय अधिकचे क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Floods: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्नाटकात पीक नुकसानीची प्रति हेक्टर ८,५०० रुपये अतिरिक्त भरपाई

Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 

Women Empowerment: सामाजिक समावेशकतेतूनच स्त्रीशक्तीचा जागर

Market Committee: बाजार समित्यांचे नसते उद्योग

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

SCROLL FOR NEXT