Turmeric Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Research Center : वसमतच्या हळद संशोधन केंद्रासाठी १४ कोटी मंजूर

Turmeric Market : जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४ कोटी ७ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

माणिक रासवे

Hingoli News : जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४ कोटी ७ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने गुरुवारी (ता. ७) याबाबत शासन निर्णय काढला आहे.

वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्र (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र कंपनी कायद्यानुसार ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास १४ सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासना निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेकरिता २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी निधी वितरणाचा प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार कृषी आयुक्तांना निधी देण्याची बाब विचाराधीन होती.

हळद संशोधन केंद्राकरिता सहाय्यक वतनेत्तर अनुदानासाठी ६ कोटी ७४ लाख रुपये व भांडवली मत्तेच्या निर्मितीसाठी ७ कोटी ३३ लाख असे एकूण १४ कोटी ७ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cold Wave: राज्यात थंडी पुन्हा वाढली; निफाड येथे निचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Rabi Crop Insurance: रब्बी हंगामात पीकविम्याबाबत शेतकरी उदासीन

Soil Health: शाश्‍वत पर्यावरण, मानवी आरोग्यासाठी मृदा संवर्धन महत्त्वाचे...

NAFED Soybean Procurement: वाशीम बाजार समितीत नाफेड केंद्राचे उद्‌घाटन

Kesar Mango Cultivation: शेतकऱ्याने निवडला अतिसघन केसर आंबा लागवडीतून उत्पादनवाढीचा नवा मार्ग

SCROLL FOR NEXT