Turmeric Market : हळदीच्या दरात क्विंटलला दोन हजार रुपयांनी सुधारणा

Turmeric Rate : यंदाचा नवीन हळद विक्रीचा हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. बाजारात दर्जेदार हळदीची आवक होत असून हळदीचा उठावही आहे.
Turmeric
Turmeric Agrowon
Published on
Updated on

Sangli News : यंदाचा नवीन हळद विक्रीचा हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. बाजारात दर्जेदार हळदीची आवक होत असून हळदीचा उठावही आहे. त्यामुळे एका महिन्यात हळदीच्या दरात प्रतिक्विंटल दोन हजारांनी सुधारणा झाली. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हळदीला चांगले दर मिळत आहेत. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

देशासह राज्यात जानेवरीच्या मध्यापासून हळद काढणीला सुरुवात झाली पण फारशी गती आली नव्हती. त्यामुळे बाजारात दररोज चार ते पाच हजार पोत्यांची (एक पोते ६० किलोचे) आवक होत होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून हळद काढणीला गती आली होती.

त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापासून बाजार समितीत दररोज सुमारे १५ हजारांहून अधिक पोत्यांची आवक होत आहे. एका महिन्यात हळदीची अंदाजे दोन लाख पोत्यांची विक्री झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Turmeric
Turmeric Harvesting : वाशीममध्ये हळद काढणी सुरू

यंदाचा हळद विक्रीचा हंगाम फेब्रुवारीमध्ये सुरू झाला. हंगामाच्या सुरुवातीला हळदीच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १३ हजारांपासून ते २३ हजार रुपये दर होता. वास्तविक, गेल्यावर्षीच्या तुलनेत हळद विक्रीच्या प्रारंभापासूनच हळदीला चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी हळद विक्रीसाठी नियोजन करत आहेत.

पावसाची कमतरता असली तरी, शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत दर्जेदार हळद पिकवली आहे. त्यामुळे बाजारात दर्जेदार हळद विक्रीला येऊ लागली असून हळदीला चांगली मागणी असून उठावही आहे. हळदीला स्पर्धेतून दर मिळत आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येत आहेत. नांदेड, वसमत, जळगाव यासह अन्य भागातील हळदीची अद्याप बाजार समितीत आवक सुरू झाली नाही.

मार्चच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून परपेठ (पर जिल्हा, परराज्य) हळदीची आवक सुरू होईल. हळदीच्या दरात सुधारणा झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. येत्या काळात हळदीचे दर टिकून राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

Turmeric
Turmeric Market : नांदेडला नव्या हळदीला कमाल १५३७७ रुपयांचा दर

मार्केटिंगसाठी बाजार समितीचा पुढाकार

नांदेड, जळगाव, वसमत, हिंगोली, निजामबाद या भागांतील शेतकऱ्यांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी बाजार समितीने समाज माध्यमांचा वापर करून हळदीचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार बाजार समितीने (Bazar Samiti) सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातील हळद उत्पादक शेतकरी सांगली बाजार समितीत हळद विक्रीसाठी येतील, अशी आशा आहे.

प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रतिक्विंटल)

लगडी...२२ हजार ते २४ हजार

पावडर क्वॉलिटी...१६ हजार ते १७ हजार

मध्यम...१८ हजार ते १९ हजार

उच्च प्रतिची...२० हजार ते २४ हजार

गड्डा...१६ हजार ते १७५००

सांगली म्हणजे हळद ही परंपरा आहे. हळद सांगली बाजाराकडे पुन्हा यावी, यासाठी सर्वच घटकांनी पुढाकार घेतला आहे. इथे सर्वाधिक दर मिळतो, हा शेतकऱ्यांचा विश्‍वास पुन्हा सार्थ ठरला आहे. दक्षिण भारतातील शेतकरी इथे हक्काने येतात. त्यांना सर्व त्या सुविधा देऊ.
- सुजय शिंदे, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती.
यंहा हळदीचा दर्जा चांगला आहे. हळदीला दर चांगले मिळत असल्याने शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येऊ लागले आहेत. हळदीचा उठावही आहे. हळदीच्या दरात फारशी तेजी मंदी होण्याची चिन्हे नाहीत.
- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com