Amaravati News : एप्रिल महिन्यात गारपीट, पूर्वमोसमी पाऊस तसेच वादळी वाऱ्याचा फटका बसत सुमारे १३७ कोटी रुपयांच्या संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. तब्बल ६४ हजार शेतकऱ्यांच्या ४५ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना देखील याचा दणका बसत सुमारे १५५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे.
राज्यात सुमारे दीड लाख हेक्टर तर एकट्या अमरावती जिल्ह्यात सर्वाधीक १ लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. त्यातील वरुड, मोर्शी तालुक्यांत या फळपिकाखालील क्षेत्र ७० ते ७५ हजार हेक्टरच्या घरात आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. त्याचा सर्वाधीक फटका आंबिया बहारातील संत्रा फळांना बसला आहे. सध्या लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची ही फळे आहेत.
गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाचा सर्वाधीक फटका संत्रा उत्पादकांना बसला. सुमारे ३८ हजार हेक्टरमधील संत्रा बागा बाधित झाल्या. त्यामध्ये सर्वाधीक ८६४२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान हे अचलूर तालुक्यात नोंदविण्यात आले आहे.
पूर्वमोसमी पावसाचा सुमारे ६४ हजार शेतकऱ्यांना फटका बसत त्यांचे ४५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. आर्थिक तरतुदीनुसार एकूण १५५ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रशासनाचा अहवाल असून त्यामध्ये सर्वाधीक १३७ कोटी रुपयांचे नुकसान एकट्या संत्रा बागायतदारांचे असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
पूर्वमोसमी पावसामुळे १८ हेक्टर लिंबू तसेच ७.८९ हेक्टरमधील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच २० हजार शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये उन्हाळी तीळ ६७३, टरबूज-खरबूज २.७५, भाजीपाला व फुले ३३१, गहू २६९८, हरभरा ५६, कांदा २२५८, मूग १.३५, केळी १११.७८, पपई ०.५ हेक्टर याप्रमाणे नुकसान झाले आहे. बाधित ६६५६ हेक्टरसाठी १७.९७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
संत्रा पिकाचे तालुकानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
अमरावती ः ८.९
भातकुली १.३
चांदूररेल्वे ः १०६
नांदगाव खंडेश्वर ः ६९
मोर्शी ः ६०४१
अचलपूर ः ८६४२
तिवसा ः २१५
वरुड ः ८२३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.