Rain Update | Pune Rain Updates |Rainfall Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात १३० टक्के पाऊस; वेल्हा मंडलात सर्वाधिक

Team Agrowon

Pune News : पावसाचे जवळपास तीन महिने झाले आहेत. या काळात कमीअधिक पाऊस पडला आहे. या काळात सरासरीच्या ७०५.१ मिलिमीटरपैकी ९१७.५ मिलिमीटर म्हणजेच १३० टक्के पाऊस झाला आहे. यंदा जूनच्या तुलनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. यामध्ये वेल्हा येथे सर्वाधिक ५०१८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

पुणे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांची पावसाची सरासरी ८६१.६ मिलिमीटर आहे. जूनचीही सरासरी १७६.२ मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत १७१.४ मिलिमीटर म्हणजेच ९७.३ टक्के पाऊस पडला असला तरी सरासरीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी त्यात घट झाली. तर जुलैची सरासरी ३०९.३ मिलिमीटर आहे. त्यापैकी चालू वर्षी ४४३.२ मिलिमीटर म्हणजेच १४३ टक्के पाऊस झाला आहे.

यंदा जूनच्या तुलनेत जुलैमध्ये अधिक पाऊस झाला. तर ऑगस्टमध्येही सरासरीच्या २१९.६ मिलिमीटरपैकी ३०३ मिलिमीटर म्हणजेच १३८ टक्के अधिक पाऊस झाला. त्यामुळे धरणांतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये सरासरीच्या १७६.२ पैकी अवघा ९०.७ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के, तर जुलैमध्ये सरासरीच्या ३०९ पैकी २८१.१ मिलिमीटर म्हणजेच ९० टक्के पाऊस झाला होता. तर ऑगस्टमध्ये सरासरीच्या २१९.६ पैकी ८६.३ मिलिमीटर म्हणजेच ३९ टक्के पाऊस झाला होता. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.

यंदा साधारणपणे सात जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमीअधिक होता. यात मुठा खोरे, निरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला.

त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. धरणांत सुरुवातीला कमी आवक होती. त्यानंतर झालेल्या पावसामुळे ऑगस्टमध्ये चासकमान, भाटघर, वीर, पवना, भामा आसखेड, कळमोडी, खडकवासला, उजनी अशा सर्वच धरणांत नव्याने पाण्याची आवक झाल्याने जवळपास शंभर टक्के भरली आहे. त्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात तीन महिन्यांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : स्रोत - कृषी विभाग

हवेली ः पुणे वेधशाळा, केशवनगर ८४२, कोथरूड १२५४, खडकवासला १०९१, थेऊर ४७६, उरुळीकांचन ४३३, खेड ११९३, भोसरी ५५५, चिंचवड ४३९, कळस ५२७, हडपसर ५५३, वाघोली ४३५, अष्टापूर ४३७

मुळशी ः पौड १९०९, घोटावडे १५८७, थेरगाव ७७७, माले २६७७, मुठे ३४८७, पिरंगुट ११८९.

भोर ः भोर १३६४, भोलावडे २४४५, नसरापूर १६५६, किकवी ९११, वेळू ११७०, आंबवडे १४५४, संगमनेर ११३६, निगुडघर २३३३

मावळ ः वडगाव मावळ १२४५, तळेगाव ९९१, काले २१८१, कार्ला ४५७२, खडकाळा २०३६, लोणावळा ३६६८, शिवणे १६०९

वेल्हा ः वेल्हा ५०१८, पानशेत ३२५२, विंझर २३३७, आंबवणे १६६४.

जुन्नर ः जुन्नर ५११, नारायणगाव ३९२, वडगाव आनंद ३७७, निमगाव सावा ३८२, बेल्हा ४४६, राजूर ८१२, डिंगोरे ६६१, आपटाळे ७२६, ओतूर ४३७

खेड ः वाडा ९५०, राजगुरुनगर ५५६, कुडे १०९७, पाईट ९६२, चाकण ६७८, आळंदी ५४४, पिंपळगाव ५२२, कन्हेरसर ५५०, कडुस ६१२

आंबेगाव ः घोडेगाव ६२२, आंबेगाव ३०३५, कळंब ३८२, पारगाव २५२, मंचर ४४५

शिरूर ः टाकळी हाजी २५४, वडगाव ३१६, न्हावरा ४९०, मलठण ३८९, तळेगाव ५१०, रांजणगाव ४१८, कोरेगाव ३५२, पाबळ ४२७, शिरूर ४०६

बारामती ः बारामती ३८५, माळेगाव ३३३, पणदरे ३७५, वडगाव ४३५, लोणी ३३३, सुपा ४७०, मोरगाव ५०१, उंडवडी ५३८

इंदापूर ः भिगवण ४८४, इंदापूर ५३३, लोणी ४६६, बावडा ३७२, काटी ३९२, निमगाव ४८२, अंथुर्णी ३७३, सणसर ७०६

दौंड ः देऊळगाव ३४२, पाटस ५१५, यवत ३३१, केडगाव ४०३, राहू ३८६, वरवंड ४५१, रावणगाव ४७०, दौंड ५२३, बोरी बधक ४२६, खामगाव ४८१, वडगाव बांदे ३५८, पारगाव ६१५, बोरी पार्धी ३८०

पुरंदर ः सासवड ७०४, भिवंडी ४३४, कुंभारवळण ४९८, जेजुरी ३५०, परिंचे ३७७, राजेवाडी ४१८, वाल्हा ३१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT