Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सांगली जिल्ह्यात एका वर्षात होणार १३० सेंद्रिय गट स्थापन

Natural Farming Mission : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत जिल्ह्यात सेंद्रिय गट स्थापन करण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी १३० गट स्थापनेचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Sangli News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत जिल्ह्यात सेंद्रिय गट स्थापन करण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी १३० गट स्थापनेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २ कोटी २९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केल्याची माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक जांबुवंत घोडके यांनी दिली.

शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे गट स्थापन करून सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोस्ताहिक केले जाणार आहे.

त्याचबरोबर सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गट स्थापन केल्यानंतर सेंद्रिय शेतीचे प्रमाणिकरणही केली जाईल. शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या पिकांची बाजारातपेठेत विक्री करणे साध्य होईल.

सांगली जिल्ह्यात यावर्षी १३० सेंद्रिय गट स्थापनेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक तालुक्याला किती गटांची स्थापना करायची आहे, त्याचे लक्ष्यांक्षही तालुका आत्मा विभागाला सांगण्यात आले आहे. त्यानुसार एका गटात ५० हेक्टर क्षेत्र असणार आहे.

१३० सेंद्रिय गटांसाठी २ कोटी २९ लाख रुपयांना निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांत ३९० गट स्थापन करण्याचे नियोजन केले आहे. ३९० गटांच्या माध्यमातून १९५०० हेक्टर सेंद्रिय पिकाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.

या गटामध्ये समाविष्ट शेतकऱ्यांचे सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण तीन वर्षांत केले जाणार आहे. ‘आत्मा’कडून शेतकऱ्यांना गाव पातळीवर विविध प्रकारची प्रशिक्षणेही देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळे याची माहिती दिली जात आहे. तसेच कीड-रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन, हिरवळी खतांचे महत्त्व याबाबात शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देण्याचे काम सुरू आहे. सेंद्रिय निविष्ठा, अन्नद्रव्य व्यवस्थापन आदींचे मार्गदर्शन केले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT