Soybean MSP Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Soybean Procurement Update : सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरु करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात १३ लाख ८ हजार टन सोयाबीनची हमीभावाने खेरदी करण्याला केंद्राने परवानगी दिली आहे.

Anil Jadhao 

Pune News : सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरु करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात १३ लाख ८ हजार टन सोयाबीनची हमीभावाने खेरदी करण्याला केंद्राने परवानगी दिली आहे. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरु होणार असून प्रत्यक्ष खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

यासंबंधीचे परिपत्रक सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने नुकतेच काढले. सोयाबीनसोबतच राज्यसरकारने मूग आणि उडदाची हमीभावाने खेरदीला मान्यता दिली. राज्यात यंदा खरिपातील १३ लाख ८ हजार २३८ टनांची खरेदी होणार आहे. उडदाची १ लाख ८ हजार १२० टन खरेदी हमीभावाने खरेदी होणार आहे. तर मुगाची १७ हजार ६८८ टन खरेदी होईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

हमीभावाने सोयाबीन, मूग आणि उडीद विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर मूग आणि उडदाची हमीभावाने खरेदी १० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सोयाबीनची खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरु होईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. 

मूग आणि उडदाची खरेदी करताना कृषी विभागाच्या उत्पादनाच्या पहिल्या अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकतेप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याकडून आणि केंद्राने ठरवून निश्चित केलेल्या उद्दीष्टाप्रमाणे खरेदी होणार आहे.  तर १३ लाख ८ हजार २३८ टनांपैकी पहिल्या टप्प्यात १० लाख टनांची खरेदी करावी, असेही या परिपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 

एकूण उत्पादनाच्या  २५ टक्के खरेदी होणार

सरकारच्या अंदाजानुसार राज्यात मागच्या हंगामात ५२ लाख ३० हजार टन सोयाबीन उत्पादन झाले होते. राज्यात यंदाही सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीच्या जळपास राहू शकते, असा अंदाज आहे. तर केंद्र सरकारने राज्यात १३ लाख ८ हजार टन सोयाबीन हमीभावाने खरेदीला परवानगी दिली आहे. म्हणजेच राज्यात उत्पादीत होणाऱ्या एकूण उत्पादनाच्या जवळपास २५ टक्के खरेदी सरकार करणार आहे. 

शेतकऱ्यांना आधार

सध्या बाजारात सोयाबीनचा भाव दबावात आहे. काही ठिकाणी सोयाबीनची काढणी सुरु झाली. पण मालामध्ये सध्या ओलावा जास्त आहे. तसेच पावसाने खराब झालेलाही माल बाजारात येत आहे. अशा मालाला ४ हजारांपासून भाव मिळत आहे. तर एफएक्यू दर्जाच्या मालाला ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आता सरकारने हमीभावाने खरेदीची प्रक्रिया जाहीर केली. प्रत्यक्ष खरेदी सुरु होईल तेव्हापासून बाजारात नवा मालाची आवक वाढत जाणार आहे. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. सरकारच्या खरेदीमुळे खुल्या बाजारातही भाव सुधारण्यास मदत होईल. 

नोंदणी कशी करायची

हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ई-समृध्दी पोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करताना आधार क्रमांक, पिकाची नोंद असलेला सातबारा आणि बॅंकेचे पासबूक ही कागदपत्रे आवश्यक आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा

Rain Update : सिंधुदुर्गात अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Ethanol Pump Station : महाराष्ट्रासह चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार

Indian Agriculture : ‘वाघबारसे’च्या निमित्ताने शेतकऱ्यांची निसर्गाला प्रार्थना

SCROLL FOR NEXT