Rabi Seed Agrowon
ॲग्रो विशेष

National Seed Conference : छत्रपती संभाजीनगर येथे १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषद

माणिक रासवे

Parbhani News : नवी दिल्ली भारती बियाणे तंत्रज्ञान संस्था, वाराणसी येथील राष्ट्रीय बियाणे संशोधन संस्था व वसंतराव नाईक मराठवाडा कृषीतर्फे सोमवार (ता.११) ते बुधवार (ता.१३) या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषद

होणार आहे. परभणी कृषी विद्यापीठास प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय बियाणे परिषदेचे यजमानपद मिळाले आहे. ‘अॅग्रोवन’ या परिषदेचे माध्यम सहयोगी आहे,’’ अशी माहिती परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी शुक्रवारी (ता. ८) दिली.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, ‘‘बदलत्या हवामान स्थितीत नवसंशोधन व दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी निर्माण झालेली आव्हाने हे या परिषदेची ‘थीम’ आहे. या परिषदेचे आयोजन माझ्या अध्यक्षतेखाली करण्यात येत आहे. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर तर निमंत्रक, आयोजन सचिव डॉ. के. एस. बेग आहेत.

हॉटेल ताज विवांतरा येथे या उद्घाटन सोमवारी सकाळी ९ वाजता होईल. विशेष अतिथी म्हणून कृषिमंत्री धनंजय मुंढे यांना आमंत्रित केले आहे. कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज अहुजा, विशेष सचिव राकेश रंजन, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, माजी महासंचालक डॉ. मंगला राय, कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव (बियाणे) पंकज यादव, अतिरिक्त मुख्यसचिव अनुप कुमार, बीजमाता राहीबाई पोपरे, कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंग, सोनीपत (हरियाना) येथील प्रगतिशील शेतकरी कंवल सिंह चौहान, बीज तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच. एस.गुप्ता, वाराणसी येथील राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक मनोज कुमार आदी उपस्थित राहतील.’’

‘‘देशभरातील कृषी संशोधक, नामांकित शास्त्रज्ञ, बियाणे उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खासगी उद्योजक, विद्यार्थी सहभागी होतील. एकूण सहा तांत्रिक सत्रांमध्ये व तीन समूह चर्चासत्रांमध्ये बियाण्यासंबंधी विविध विषयांवर शास्त्रज्ञांचे सादरीकरण व चर्चा होईल.

मंगळवारी (ता.१२) भारतीय बीज तंत्रज्ञान संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या अमीर सिंह जीवन गौरव पुरस्काराचे वितरण होईल. बुधवारी (ता.१३) समारोपप्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी सचिव डॉ. आर. एस. परोडा उपस्थित राहतील,’’ असे डॉ. इंद्र मणी म्हणाले. डॉ.दत्‍तप्रसाद वासकर,विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले आदींची उपस्थिती होती.

‘‘परिषद दिशादर्शक ठरेल’

‘‘शुद्ध व दर्जेदार बियाणे निर्मिती व उपलब्धता, बियाणे बदल दर, बियाणे प्रक्रिया व साठवण पद्धती व व्यवस्था, बियाणे उद्योगातील प्रश्न व त्यांचे इतर राज्यात होणारे स्थलांतर, बियाणे संदर्भातील कायदे व नियमन आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यावर सखोल चर्चा करणे व पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शुद्ध व दर्जेदार बियाणे उत्पादन, प्रक्रिया व साठवणूक, हाताळणी आणि पुढे सुयोग्य वापर व उत्पादन वाढ यासाठी संशोधन संस्था, बियाणे महामंडळ, बीजोत्पादन संस्था, उत्पादक, बियाणे उद्योजक यांच्यात योग्य समन्वय, चर्चा व एक निश्चित धोरण ठरविणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीने ही परिषद दिशादर्शक ठरेल,’’ असे डॉ. इंद्र मणी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT