Farmer Death Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Death : सहा महिन्यांत १२६७ शेतकरी आत्महत्या

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्य आत्महत्यामुक्त करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा हवेत विरली असून, राज्यातील शेतकऱ्यांना १५ हजार कोटींहून अधिक रक्कमही दिल्याचा दावा केला जात आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल १२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले असून, मे आणि जून महिन्यात अनुक्रमे २०६ आणि १९३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र दिवसेंदिवस हा दावा फोल ठरत असल्याचे समोर आले आहे. राज्यात जानेवारी महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २३६ आत्महत्या झाल्या असून, त्यापाठोपाठ मार्च महिन्यात २२९, फेब्रुवारीत २१०, मे महिन्यात २०६, एप्रिल महिन्यात १९३, जून महिन्यात १९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

अमरावती विभागात सर्वाधिक ५५७ शेतकऱ्यांनी जीवन संपवले असून फेब्रुवारी महिन्यात १०० मार्चमध्ये ११७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये ४३०, नागपूर विभागात १३०, नाशिक विभागात १३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पुणे विभागात १३ आत्महत्या केल्या आहेत.

अमरावती, यवतमाळमध्ये सर्वाधिक

अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात १७० शेतकऱ्यांनी जीवन संपवले असून पाठोपाठ यवतमाळमध्ये १५०, बुलडाण्यात १११, अकोल्यात ९२, वाशीममध्ये ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात बीड जिल्ह्यात १०१ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची मदत केली हेच फेक नॅरेटिव्ह आहे. शेतकऱ्यांची मदत करतो असे सांगत आकडे फुगवून महायुती सरकार थट्टा करत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या सत्य परिस्थिती दाखवत आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काहीही मदत मिळत नाही.

शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने केली हेच सत्य आहे.- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा राजकीय कुरघोड्या आणि स्वार्थासाठी राज्याची घडी विस्कळीत झाल्याने शेती आणि शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष सत्ताधाऱ्यांनी केले आहे.

परिणामी, शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतीमालाचे भाव पडले आहेत. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. या प्रमुख कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने आतातरी स्वार्थी राजकारण सोडून या तीन कारणांवर काम केले पाहिजे तरच आत्महत्या थांबतील.
अजित नवले, राष्ट्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT