Farmer Cheating : सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक : वडेट्टीवार

Vijay Waddetiwar : ‘राज्याला उद्ध्वस्त करण्याचा, खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम सरकारकडून सुरू आहे.
Vijay Waddetiwar
Vijay WaddetiwarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : सरकारच्या आशीर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे.

गंभीर पाणी प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षांनी जाहीर केले.

सोमवारपासून (ता. २६) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ‘राज्याला उद्ध्वस्त करण्याचा, खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम सरकारकडून सुरू आहे.

Vijay Waddetiwar
VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेत सामंजस्‍य करार

अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही.’ अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख, शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, की महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे. परंतु या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली असून, राज्याच्या आदर्श, सुसंस्कृत राजकीय परंपरेला गालबोट लागले आहे. गुंड मंत्रालयात रिल बनवतात. पुण्यात २०० गुंडांची परेड होते. त्यानंतर पुण्यात २२ हजार कोटींचे ड्रग सापडते तरी सरकार गप्प आहे.

गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने पोलिसांना गुंड जुमानत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर गुंडांशी सल्लामसलत केली जाते. आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतात. प्रक्षोभक विधान करून, चिथावणीखोर भाषण करू राजकीय वातावरण काही लोकप्रतिनिधी गढूळ करतात. खुलेआम स्टेजवरून माता-भगिनींविषयी काहीही बोलले तरी देखील सरकार त्यांना पाठीशी घालते. गुंडांना पोसण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकार करत आहे.

Vijay Waddetiwar
Environment Conservation : पर्यावरण संवर्धनासाठी दांपत्याने सोडली मुंबई

ते म्हणाले, की सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोर्टात न टिकणारे आरक्षण दिले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतीमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. कांद्यावरील निर्यातबंदी उठवली जात नाही. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन खरेदी केली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयांचे अनुदान दिले नाही. तरीही सरकार टेंभा मिरवते आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

राज्याची प्रतिमा मलिन होतेय

विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘या सरकारने केवळ कंत्राटदार, घोटाळेबाजांचे हित जोपासले आहे. राज्यात पाणीप्रश्न गंभीर आहे. तरी देखील सरकारला गांभिर्य नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष. पक्ष फोडाफोडीत व्यग्र असलेल्या सरकारला जनतेच्या कामांसाठी वेळ नाही. विदर्भातील प्रश्न, शेतकऱ्यांबद्दल अनास्था, घोटाळ्यांची मालिका, भ्रष्टाचाराला ऊत, दलित, आदिवासींवर अन्याय, मुस्लिमांवर अन्याय, ड्रग प्रकरण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com