Manjara Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Manjara Dam : ‘मांजरा’च्या १२५ किलोमीटर पात्रात पाणी

Manjara River : काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मात्र, मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात चांगले पाणी आले आहे.

Team Agrowon

Latur News : काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मात्र, मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात चांगले पाणी आले आहे. या नदीपात्रात असलेल्या पंधरा उच्च पातळी बंधाऱ्याच्या प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. नदीपात्रात शेवटचा होसूर बंधारा आहे. हा बंधारा सतत भरत असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आतापर्यंत या बंधाऱ्यातून ९६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा कर्नाटकात विसर्ग करण्यात आला आहे.

३२ दशलक्ष घनमीटर साठा मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात १५ उच्चपातळीवरील बंधारे आहेत. या बंधाऱ्यांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा ६४.८४६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या या बंधाऱ्यात एकूण पाणीसाठा ३२.८९ दशलक्ष घनमीटर इतका आहे. याची टक्केवारी ५०.७३ इतकी आहे.'

दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग

काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी येत आहे. नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच बंधाऱ्यांचे एक दोन दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्र पाण्याने भरले जात आहे.

कर्नाटकात सोडले पाणी

होसूर येथे मांजरा नदीच्या पात्रातील शेवटचा उच्चपातळी बंधारा आहे. या बंधाऱ्याचा प्रकल्पीय पाणीसाठा २.२५० इतका आहे. तो सातत्याने भरला जात आहे. त्यामुळे त्याचे दरवाजे उघडून पाणी नदीत सोडले जाते. आतापर्यंत ९६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी कर्नाटकात गेले आहे.

बंधाऱ्यातील पाण्याची स्थिती (दलघमीत)

बंधारा जलसाठा सध्याचा साठा टक्केवारी

लासरा ३.००० १.१३६ ३७.८७

वांजरखेडा ३.६०० २.०५२ ५७.००

टाकळगाव १.९१६ ०.९७५ ५०.८९

वांगदरी ०.८४३ ०.३०५ ३६.१८

कारसा पोहरेगाव ३.४१० १.३०६ ३८.३०

साई ३.४७० १.७८२ ५१.३५

नागझरी ३.४८६ १.७६९ ५०.७५

शिवणी ९.८१० ५.१४३ ५२.४३

खुलगापूर ९.७०८ ३.६२९ ३७.३८

बिंदगीहाळ १.३५० १.०२८ ७६.१५

डोंगरगाव ७.९०२ ४.२३९ ५३.६५

धनेगाव ११.१०१ ७.०८५ ६३.८२

होसूर २.२५० १.३२५ ५८.८९

भुसणी १.४९० १.१२० ७५.१६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT